कळंब तालूक्यातील कन्हेरवाडी पाटी बनला मृत्यूचा सापळा 

दिलीप गंभीरे
Friday, 30 October 2020

कळंब : बार्शी मार्गावरील कन्हेरवाडी पाटीजवळ रखडलेले रस्त्याचे काम.

कळंब (उस्मानाबाद) : कळंब ते बार्शी शहरापासून हाकेच्या अंतरावरील मांजरा नदी ते येरमळा मार्गावरील तलाव तसेच आंदोरा ते कन्हेरवाडी पाटी दरम्यान महामार्ग नसून मृत्यूचा सापळाच बनलाय. कन्हेरवाडी पाटीजवळ रस्ता खोदून ठेवलाय. जम्पिंग आणि खड्डे असल्याने हा रस्ता अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या खड्ड्यात मालवाहतूकीचे अवजडवाहन रात्री मार्गस्थ होताच वाहनातील साहित्य चोरले जाते. आतापर्यत पाच कोटी रुपयाहून अधिक चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून चोरटे, रस्ते विकास महामंडळ, कंत्राटदार आणि प्रशासनात मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे आणि प्रशासन,लोकप्रतिनिधीनी कंत्राटदारांचा 'लाड' पुरविल्यामुळे या मार्गावरच काम जागोजागी रखडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या मार्गाचे काम करतेवेळी जमीन मालकांनी जागोजागी रस्त्याचे काम आडविले मार्ग काढून रस्त्याचे काम शहराला चिटकले. मात्र कन्हेरवाडी पाटी दरम्यान अडविण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न सोडविण्यात आला नाही.त्यामुळे चोरटे,रस्ते विकास महामंडळ आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे तर तर नाही असा संशयित प्रश्न निर्माण होत आहे.या ठिकाणी रात्रीच्या वेळी अवजड वाहने मार्गस्थ होतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खड्यामुळे वाहनांची स्पीड झिरोवर येते,तेवढ्या वेळेत चालत्या वाहनातून साहित्य लंपास करण्यात येते हा प्रकार 2017 पासून सुरू आहे.त्यामुळे मार्गावरील रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावरील आंदोरा ते कन्हेरवाडी पाटी दरम्यानचे अंदाजे चारशे मिटर अंतराचे काम खितपत पडले आहे.मांजरा नदी ते तलावापर्यत रस्ता खोदून ठेवला आहे.वाहनधारकासाठी अतिशय धोकादायक ठरत आहे.दररोज दुचाकीधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.चारचाकी वाहने खिळखिळी होत असल्याने वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी वाहनधारकांना हजारो रुपयाचा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अपघात आणि चोरी प्रकारात वाढ
कन्हेरवाडी पाटीजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वाहने आपटून व बाजू घेताना अपघात होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत.दोन दिवसांपूर्वीच दुचाकीला ठोकर मारून आज्ञात वाहन पळून गेले त्यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून अवजड वाहनातून साहित्य लंपास करण्याच्या घटना तर दररोज घडत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanherwadi Pati became a death trap kalanbh news