esakal | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी, कोरोनाच्या धोका वाढू लागल्याने प्रशासन सतर्क
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga Osmanabad News

२२ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्य सिमेवर नाकाबंदी सुरु झाली होती. रोजी-रोटीसाठी मुंबई येथे कामाला असलेले तेलंगणा राज्यातील जवळपास चारशे मजूर  गावाकडे परतत असताना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तैनात असलेल्या कर्नाटक पोलिसांनी २७ मार्चला रोखले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी, कोरोनाच्या धोका वाढू लागल्याने प्रशासन सतर्क

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने देशपातळीवर सतर्कतेसाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही कोरोना संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. दरम्यान उमरगा तालुक्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन सीमा आहेत. त्या ठिकाणी कर्नाटक पोलिसांकडून गेल्या आठ दिवसांपासुन नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा - थरार! काही कळण्यापूर्वीच भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, उपचारापूर्वीच सोडला जीव


कोरोना संक्रमणाचा वेग रोखण्यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्याचा निर्णय कर्नाटक राज्याने घेतलेला दिसतो. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील सीमेवर तसेच लातूर-कलबुर्गी मार्गावरील खजूरी सीमेवर पोलिसांकडून वाहनाची, व्यक्तींची तपासणी केली जातेय. महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या व्यक्तींची ऑक्सिमीटरने तापमान तपासणी, विनामास्क व्यक्तींवर दंडात्मक कारवाई, गरजेनुसार जलद तपासणी आणि रॅपिड तपासणी केलेल्या प्रमाणपत्राची मागणी पोलिसांकडून केली जातेय.

हेही वाचा - भीषण अपघात! साताजन्माची शपथ राहिली अधुरी; पतीने सोडली मधेच साथ

वाहनात मर्यादेपेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून वाहनांच्या कागदपत्रांची मागणी केली जातेय. शिवाय दंडही आकारला जातोय. बसच्या वाहक, चालकासह प्रवाशांची तपासणी केली जात असून संशय वाटल्यास जागेवरच जलद चाचणी केली जातेय. विशेषतः ६५ वर्षावरील जेष्ठांची तर आवर्जून तपासणी करून त्यांचे नाव, पत्ता नोंदवला जातोय. दरम्यान सूरक्षिततेच्या दृष्टीने कर्नाटक पोलिस व आरोग्य प्रशासनाने सतर्कतेसाठी सुरु केलेले काम योग्य असले तरी पदेवदर्शनासाठी जाणारे, नुकताच विवाह सोहळा झालेल्या वधूवर, नातेवाईकांची ऐनवेळी पंचाईत होत आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे करा क्लिक

जिल्हा प्रशासनाकडून कधी होणार तपासणी ! : २२ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्य सिमेवर नाकाबंदी सुरु झाली होती. रोजी-रोटीसाठी मुंबई येथे कामाला असलेले तेलंगणा राज्यातील जवळपास चारशे मजूर  गावाकडे परतत असताना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तैनात असलेल्या कर्नाटक पोलिसांनी २७ मार्चला रोखले होते. शेवटी उमरग्याच्या प्रशासनाने महिनाभर त्यांची रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे पुन्हा येणाऱ्या काळात स्थलांतरासाठी अडचणी येणार आहेत. दरम्यान उमरगा तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने जवळपास वीस ते पंचवीस गावांचा येथील बाजारपेठेशी, विशेषतः वैद्यकीय उपचारासाठी बऱ्याच नागरिकांचा संपर्क येतो. नाकाबंदीमुळे गेल्या आठ दिवसांत येथील आरोग्यनगरीतील ओपीडीत रुग्णसंख्या घटली आहे. दरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालय असो की खाजगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत कर्नाटकातील काही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. सतर्कता म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने दोन्ही सीमेवर पोलिस व आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image