esakal | करवंजी : गेल्या वीस दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात
sakal

बोलून बातमी शोधा

वीज पुरवठा खंडित

करवंजी : गेल्या वीस दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात

sakal_logo
By
सुधीर कोरे

जेवळी : करवंजी (ता लोहारा) गावाला वीज पुरवठा करणारी गावठाण ट्रांसफार्मर (डेपी) नादुरुस्त झाल्याने गेल्या वीस दिवसांपासून संपूर्ण गावाची वीज पुरवठा खंडित झाली असल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुरुस्ती बाबत नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा केला जात असताना विविध कारणे सांगत वीज वितरण कार्यालयाकडून दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. वीस दिवसांपासून गाव अंधारात असलेल्यांने येथील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे  

हेही वाचा: मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

लोहारा तालुक्यात अंतर्गत भागातभागात वसलेल्या करंवज गावची लोकसंख्या ही जवळपास दिड हजार एवढी आहे. ९३ भूकंपनंतर घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. नागरिकांनी एकत्र येत गावाशेजारी असलेल्या २८ एकर गायरानात प्लॉटिंग करत शासनाच्या अनुदानातून गावचे पुनर्वसन केले आहे. या वस्तीत २५२ घरे असून या सर्व घरांना वीज पुरवठा करण्यासाठी येथे एकच ट्रांसफार्मर (डेपी) आहे. 

हेही वाचा: बीड : बिंदुसरा धरण तुडुंब भरले; पर्यटकांची गर्दीही वाढली

आता कुटुंबसंख्या दुपटीने वाढल्याने येते आणखी एक ट्रांसफार्मरची गरज आहे. परंतु याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अतिरिक्त भार पडून येथील ट्रांसफार्मर वारंवार नादुरुस्त होत आहे. यातच कंपनीच्या दुर्लक्षाने केबल, किटकॅट आधीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यातून गेल्या १८ ऑगस्टला हा ट्रांसफार्मर नादुरुस्त झाला आहे. आता वीस दिवसात झाले तरी हा ट्रांसफार्मर दुरुस्त झाला नाही. दुरुस्ती बाबत नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला जात असताना येणेगुर (ता. उमरगा) येथील वीज वितरण कार्यालयाकडून विविध कारणे सांगत दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. 

वीस दिवसांपासून गाव अंधारात असलेल्यांने येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथे पशुपालक व शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पोळा सारखा सनही अंधारात साजरा करावा लागला. वीज कंपनीच्या या हलगर्जीपणाचा तीव्र संताप व्यक्त होत असून त्वरीत ट्रान्सफार्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करावी मागणी नागरिकांकडून होत आहे.  

हेही वाचा: तुळजा भवानी मातेच्या मंदीरात बैलपोळा सण साजरा

"येथील ट्रांसफार्मर बंद असल्याने वीस दिवसापासून गाव अंधारात आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना विचारले असता येथे आकड्यांचे प्रमाण जास्त आहे. या ट्रांसफार्मरवर असलेले थकित विज बिल भरल्याशिवाय ट्रांसफार्मर दुरुस्त करणार नाही असे सांगितले जात आहे परंतु वेळेवर वीज भरणा करणाऱ्या ग्राहकही यात भरडले जात आहे. सध्या पावसाळ्याबरोबरच सणासुदीचे दिवस असून वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे गेल्या वीस पासून संपूर्ण गाव अंधारात आहे."

- बिबीशन हक्के, ग्रामपंचायत सदस्य करवंजी

"ऑईल उपलब्ध नसल्याने येथील ट्रांसफार्मर दुरुस्ती रखडली असून दोन दिवसात दुरुस्त करून येथे ट्रांसफार्मर बसवण्यात येईल."

- एस.एस. केंद्रे, सहाय्यक अभियंता वीज वितरण कार्यालय येणेगुर

loading image
go to top