कसगी गावातील युवकांचा व्हॉट्सअॅप ग्रुपच न्यारा, दिवाळीदिनी सव्वादोनशे जेष्ठांचा केला सन्मान

अविनाश काळे
Tuesday, 17 November 2020

कसगी ( ता. उमरगा) : आदर्श गाव कसगी व्हॉट्सअॅप ग्रुपने केले सत्काराचे आयोजन ;  सत्काराने भारावले जेष्ठ नागरिक!
 

उमरगा (उस्मानाबाद) : मातृ- पितृत्वाच्या आधारावर जीवनाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या तालुक्यातील कसगी गावातील तरूणांनी वयाची सत्तरी ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करुन समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दीपावली पाडवा व भाऊबीज सणानिमित्त सोमवारी (ता.१६) आदर्श गाव कसगी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वतीने लक्ष्मी मंदिर परिसरात गावातील २१४ महिला, पुरुष जेष्ठांना मायेची उबदार शाल घालून आदर व्यक्त करण्यात आला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सेवानिवृत्त अधिकारी किशनराव बाबरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव बदोले, अमरसिंह राजपूत, सुधाकर नंदर्गे, मल्लिनाथ बोरुडे, सरपंच बबीता कांबळे, माजी सरपंच  महानंदा बोरुडे, अजित जमादार अशोक पुजारी, पोलिस पाटील मंगल कांबळे, प्रा. जब्बार मुल्ला, हंसराज बदोले, माजी सरपंच धनराज बदोले, हनुमंत गुरव, विजय माशाळे, काशिनाथ पाटील, भीमाशंकर बोरूटे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. व्ही. वाय. जाधव, डॉ. विठ्ठलराव नंदर्गे, श्रीमती लक्ष्मीबाई चंद्रशेखर बदोले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विठ्ठलराव बदोले यांनी तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला उपक्रम प्रशंसनीय आहे, अशा कार्यक्रमातून वृद्धांचा आदर होतो आणि तरूणांनाही प्रेरणा मिळते. अशी भावना व्यक्त केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

श्री. बाबरे यांनी जेष्ठांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण असल्याचे मत व्यक्त केले. जेष्ठ नागरिक श्रीमंत कांबळे यांनीही तरुणांच्या या उपक्रमाचे कौतूक केले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. गंगाधर जगदाळे, हणमंत गुरव, राजू राजपूत, विनय बदोले, रवी मनगुळे, शीलन कांबळे, हंसराज जमादार, सिगल सोनकांबळे, प्रभाकर बंदीछोडे, उस्मान मुल्ला, सोमनाथ चनपटने, शाम पाटील, कल्याणी गुरव, लक्ष्मीकांत पुजारी, धैर्याप्पा हळे, दत्तुसिंग ठाकूर, मुरली जगदाळे, सुधीर जगदाळे, श्रीधर जगदाळे, दिलीप कुलकर्णी आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.  मनोज गुरव यांनी सूत्रसंचलन केले तर प्रा. गोपाळ कुलकर्णी यांनी आभार मानले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

२१४ जेष्ठांचा झाला सन्मान
वयाची सत्तरी ओलांडलेल्या ११७ पुरुषापैकी ११० तर ९७ महिलापैकी ८७ जेष्ठांचा कार्यक्रमास्थळी यथोचित सन्मान करण्यात आला. तर सतरा जेष्ठांचा घरी जाऊन संयोजकांनी सत्कार केला.

 

" उतार वयात जेष्ठांना मानसिक, शारिरिक स्वास्थ महत्वाचे असते. कौटुंबिक आधारही तितकाच महत्वाचा असतो. गावातील तरुणांनी जेष्ठाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आयोजीत केलेला उपक्रम आम्हा सर्वांना भावला. तरूणांनी सामाजिक उपक्रमात असेच सक्रिय राहुन गावाचा लौकिक वाढवावा. - डॉ. व्ही.आय. जाधव

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasgi village youth WhatsApp group ideal senior citizens were honored Diwali