esakal | कोरोना महामारीमुळे लातूर प्रशासन जागे, थुंकीमुक्त शहरासाठी मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

थुंकीमुक्त मोहीम.jpg

दरवर्षी राबविला जाणारा स्वच्छ शहर अभियान यंदा आता अधिक सावधानतेने साजरा केला जात आहे. कोरोना महामारीच्या सावटात आता थुंकीमुळे रोगराई पसरते. त्यामुळे यावर शहर थुंकीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

 

कोरोना महामारीमुळे लातूर प्रशासन जागे, थुंकीमुक्त शहरासाठी मोहीम

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : दरवर्षी राबविला जाणारा स्वच्छ शहर अभियान यंदा आता अधिक सावधानतेने साजरा केला जात आहे. कोरोना महामारीच्या सावटात आता थुंकीमुळे रोगराई पसरते. त्यामुळे यावर शहर थुंकीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग व शहरातील जागरूक नागरिक यांच्या वतीने शुक्रवारी  गांधी चौकातून थुंकीमुक्त लातूर मोहिमेला सुरवात करण्यात आली. ही मोहीम ता. १७ आक्टोबरपर्यंत चालणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, डॉ. श्रीधर पाठक, डॉ. भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात घालणारी कृती आहे व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरतात त्यामुळे शहर थुंकीमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


या मोहिमेमध्ये डॉ. माधुरी उटीकर, डॉ. अब्दुल रहेमान दायमी, प्रकाश बेंबरे, अनिल कुंभारे, संध्या शेडोळे, दीपक पवार, डॉ. राजेश शेळके , डॉ. संजय गव्हाने, डॉ. राहुल पवार, डॉ. पवन लड्डा, प्रकाश कनसे, उमेश कांबळे, क्षितीज गोजमगुंडे उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)