सख्खे भाऊ पक्के वैरी! लातूर जिल्ह्यात शेतीच्या वादातून भावासह जावयाची निर्घृण हत्या 

युवराज धोतरे 
Thursday, 11 February 2021

संगनमत करून कुऱ्हाड, तलवार, लोखंडी रॉडने सख्खा भाऊ गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली.

उदगीर (जि.लातूर) : हेर(ता.उदगीर) येथे गुरुवारी (ता.११) सकाळी आठच्या सुमारास सांडोळ-मांहाडोळ रस्त्यावर शेतीच्या वादातून सख्खा भाऊ व त्याच्या जावयाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.  याबाबत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की गुरुवारी हेर येथे सकाळी आठच्या सुमारास सख्ख्या भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले. यावेळी आरोपी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप व पूजा जगताप, आश्विनी जगताप, फुलाबाई जगताप, सोजरबाई ठगे यांनी माजी पोलिस पाटील पंडित पाटील यांच्या सांगण्यावरून संगनमत करून कुऱ्हाड, तलवार, लोखंडी रॉडने सख्खा भाऊ गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली.

शेतकरी बापाचा विश्वास लेकीने जिंकला, उपसरपंचपदी झाली बिनविरोध निवड

त्यास मोटारसायकलवर घेऊन जाणाऱ्या जावई नितीन पावडे व भाऊ भगवान जगताप यांना परत मारहाण केली. त्यात नितीन हे गंभीर जखमी झाले.  येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी गोविंद यास मृत घोषित केले, तर गंभीर असलेल्या जावई नितीन यात तातडीने लातूरला पाठवले. लातूर येथील डॉक्टरांनी नितीन यास मृत घोषित केले. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून गोविंद याचा मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात दिला.

एमजीएम रुग्णालयात ज्येष्ठावर दुर्मिळ शस्त्रक्रिया; चिरफाड न करता कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण

मृताची पुतणी जनाबाई बिरादार यांच्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात आठ आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री.जाधव हे तात्काळ उदगीरमध्ये दाखल होऊन या घटनेच्या संदर्भाने आवश्यक ती कारवाईची सुरुवात केली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या

हेर व परिसरात खळबळ....
दरम्यान या घटनेचे वृत्त हेर गावासह तालुक्यात कळताच सगळीकडे खळबळ उडाली आहे. सख्खा भाऊ येवढ्या टोकाचा निर्णय घेऊ शकतो. याची प्रचिती या घटनेवरून आल्याचे दिसून येते. या घटनेच्या संदर्भाने हेर व परिसरामध्ये पोलिस दल अलर्ट झाले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Breaking News Brother Killed Another Brother, Son In Laws In Udgir Tahsil