esakal | लातूर झेडपीच्या अध्यक्षपदी केंद्रे, उपाध्यक्षपदी सोळुंके
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

कॉंग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. यामुळे गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय उलथापालथीबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

लातूर झेडपीच्या अध्यक्षपदी केंद्रे, उपाध्यक्षपदी सोळुंके

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या सोमवारी (ता. सहा) झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे लोहारा (ता. उदगीर) गटाचे सदस्य राहूल केंद्रे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी अंबुलगा बु. (ता. निलंगा) गटाच्या सदस्या भारतबाई सोळुंके यांची बिनविरोध निवड झाली.

कॉंग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. यामुळे गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय उलथापालथीबाबत होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

भाजपच्या काही सदस्यांचा गट फुटून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या गटाला मदत करणार असल्याची चर्चा होती. मात्र, कॉंग्रेसचेच तीन सदस्य निवडीच्या सभेला गैरहजर राहिल्याने भाजपनेच कॉंग्रेसला दे धक्का दिल्याची चर्चा घडून आली.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

एकुरगा गटाचे सदस्य धीरज देशमुख हे आमदार झाल्याने त्यांचे एक पद रिक्त असून जिल्हा परिषदेच्या 57 सदस्यांत 35 भाजप, 14 कॉंग्रेस, पाच राष्ट्रवादी कॉंग्रेस, दोन अपक्ष व एक शिवसेना असे संख्याबळ आहे. 

भाजपचा एक नाराज गट...

राज्यात झालेले सतांत्तर आणि त्यानंतर राज्यातील काही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन भाजपचे सदस्य फोडून सत्ता मिळवली. यातच भाजपचा एक नाराज गट महाविकास आघाडीच्या संपर्कात होता. याची कुणकुण भाजपच्या नेत्यांना लागताच त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदस्यांची कार्यशाळा घेतली तसेच आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवले. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

दुपारी बारा वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी भाजपकडून केंद्रे, तर कॉंग्रेसकडून सोनाली थोरमोटे यांनी, तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून सोळुंके तर कॉंग्रेसकडून धनंजय देशमुख यांनी अर्ज दाखल केले. दुपारी दोन वाजता निवडीच्या सभेला भाजपचे सदस्य खासगी बसने डोक्याला भगवा फेटा व पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत जिल्हा परिषदेत दाखल झाले. 

पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरवात झाल्यानंतर थोरमोटे व देशमुख यांनी अर्ज मागे घेतले. यामुळे केंद्रे व सोळुंके यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पाठक यांनी केली. 

हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या  चर्चेला पूर्णविराम मिळाला. भाजपचे सदस्य फोडून सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसचेच तीन सदस्य गैरहजर राहिल्याने भाजपने कॉंग्रेसला धक्का दिल्याची चर्चा घडून आली.

तिरूकेंचा पत्ता कट

अध्यक्षपदी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सुटल्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांना अध्यक्षपदी बढती मिळण्याची आशा होती. गेल्या काही दिवसात तशी चर्चाही घडून आली. मात्र, ऐनवेळी तिरूके यांचा पत्ता कट झाला. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

तिरूके यांना त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी विरोध केला तर सदस्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नेत्यांनी त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा घडून येत आहे. जिल्हा परिषदेचा मोठा अनुभव असलेले तिरूकेंचा पक्षात वाढता प्रभाव व त्यांचे सर्व पक्षांसोबत असलेले चांगले संबंध त्यांना अडचणीचे ठरल्याचेही बोलले जात आहे.

loading image