esakal | आता लातूरात होणार कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार  
sakal

बोलून बातमी शोधा

plsama theropy11.jpg

लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत प्लाझ्मा दान करण्याची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना यापुढे लातूरातच प्लाझ्मा दान करता येणार आहे.

आता लातूरात होणार कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार  

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत प्लाझ्मा दान करण्याची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना यापुढे लातूरातच प्लाझ्मा दान करता येणार आहे. प्लाझ्मा दाता उपलब्ध झाल्यास या आठवड्यात ही सुविधा सुरू केली जाणार आहे. तसेच, रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत म्हणून शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोना संशयीत व्यक्तींची स्वॅब तपासणी वाढविण्यात आल्याचेही दिसून येत आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ती कमी करता यावी आणि रूग्णाला तातडीने योग्य उपचार मिळावेत म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यातच प्लाझ्मा थेरेपी हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात या संदर्भातील सुविधा निर्माण केली जात आहे. तशी ती लातूरातही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत निर्माण करण्यात आली आहे. याआधी लातूरात ही सुविधा नव्हती. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

या पार्श्वभूमीवर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले, ‘‘प्लाझ्मा संकलन करणारे अफेरेसिस उपकरण आपल्याकडे उपलब्ध झाले आहे. याआधी प्लाझ्मा संकलन करण्याची सोय आपल्याकडे नव्हती. आता ती झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सरसकट सर्व रुग्णांना प्लाझ्मा देता येत नाही. निकषांत बसणाऱ्यांनाच प्लाझ्मा दान करता येतो.’’ दरम्यान, लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी गेल्या आठवड्यापासून वाढली आहे. त्याआधी १०० स्वॅबपर्यंतच तपासणी व्हायची. पण, गेल्या आठ दिवसांत लातूर शहर आणि जिल्ह्यातील आकडा १८९ स्वॅबपर्यंत गेला आहे. त्यामुळे स्वॅब तपासणी वाढवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. या निर्णयामुळे कोरोनाबाधितांना लवकर उपचार मिळणे शक्य झाले आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  


लातूरातील स्वॅब तपासणी वाढली

तारीख : एकूण    लातूर   उस्मानाबाद
२५ :      १७४      १२८      : ४६
२६ :      १९३       ११२     : ८१
२७ :      २७५      २११     : ६४
२८ :      २४७       १८९     : ५८
२९ :       २३८     १७९     : ५९

loading image