esakal | दुसऱ्या दिवशीही दिलासा : लातूरात गरोदर महिलेसह बारा जणांनी केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

कोरोनाबाधितांची संख्या लातूर शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बुधवारी (ता. २४) १६ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.२५) १२ कोरोबाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. 

दुसऱ्या दिवशीही दिलासा : लातूरात गरोदर महिलेसह बारा जणांनी केली कोरोनावर मात

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : उस्मानाबादमधील गरोदर महिलेचा मागील आठवड्यात कोरोनामुळे लातूरात मृत्यू झाला. या घटनेनंतर लातूरमधील आणखी एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली. मात्र, लातूरमधील संबंधीत गरोदर महिलेने कोरोनावर मात केली असून त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून गुरूवारी (ता. २५) डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यासह लातूर जिल्ह्यातील १२ कोरोनाबाधित आज बरे झाले.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
कोरोनाबाधितांची संख्या लातूर शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बुधवारी (ता. २४) १६ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.२५) १२ कोरोबाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. शहरात आणि जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ५० झाली असून उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८५ झाली आहे. उपचारादरम्यान १४ जणाचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील ७ रुग्णांची प्रकृती पुर्ण पणे बरी झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता. ते रुग्ण १२ दिवस अतिदक्षता विभागात होते. तीन रुग्णांना गंभीर स्वरुपाचा आजार होता. त्यांचे वय ५०, ५२ आणि ६५ वर्षे होते. तसेच इतर चार रुग्णांना सौम्य स्वरुपाचा आजार होता. हे रुग्ण २२ ते ६५ वर्षे वयोगटातील होते. त्यात ५ पुरुष २ महिला होत्या. यात एका गर्भवती महिलेचा समावेश होता. त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली आहे. या ७ रुग्णांपैकी शहरातील ४ रुग्ण व ग्रामीण भागातील ३ रुग्ण आहेत. यात बाभळगावमधील ३, मोतीनगरमधील १, जुनी कापड लाईन भागातील २ आणि भुसार लाइन भागातील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

१७ पैकी उर्वरित ५ रुग्ण हे निलंगा आणि उदगीरमधील आहेत. यात निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील १ आणि उदगीरमधील उपजिल्हा रुग्णालयातील ४ रुग्णांचा समावेश आहे. या ४ रुग्णांमधील किणी येथील  ३ व नोबेल कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील ७ रुग्णांना घरी सोडताना त्यांचे रुग्णालयाबाहेर स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. या वेळी डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. मारूती कराळे, डॉ. किरण डावळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे उपस्थित होते.
 

loading image