
गेल्या पाच महिन्यात सर्वाधिक ऑगस्ट महिना लातूरसाठी धोकादायक ठरला आहे. या महिन्यात सर्वाधिक पाच हजार ९१२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसापासून तर दररोज दोनशे ते अडीचशे जणांना लागण होताना दिसत आहे. त्यात गेल्या पाच महिन्यात सर्वाधिक ऑगस्ट महिना लातूरसाठी धोकादायक ठरला आहे. या महिन्यात सर्वाधिक पाच हजार ९१२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या वाढत जाणार आहे, त्यामुळे लातूरकरांनी कोरोना संदर्भातील उपाय योजनांच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याची गरज आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव
लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या काळात कोरोनाचा प्रादूर्भाव अत्यंत कमी राहिला. एप्रिलमध्ये केवळ १६ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. मे महिन्यात यात थोडी वाढ झाली. या महिन्यात ११९ जण कोरोनामुळे बाधित झाले होते. यात जूनमध्ये आणखी भर पडली. या महिन्यात २१४ जणांचे कोरोना संबंधीचे अहवाल पॉझिटीव्ह आले. या तीन महिन्यात जिल्ह्यात कडक लॉकडाऊऩही होता. पोलिस लोकांना घराच्या बाहेरही निघू देत नव्हते. पण नंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. काही दिवस लॉकडाऊऩमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे लक्षात आल्यानंतर ता. १५ जुलै ते ता. १५ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. तरी देखील या कालावधीत रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलैमध्ये एक हजार ८५१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती.
बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन
त्यानंतर शासनाच्या वतीने अन्टीजेन टेस्टवर अधिक भर देण्यात आला. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अॅन्टीजेन किट उपलब्ध झाले. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने ठिकठिकाणी अॅऩ्टीजेन टेस्ट सुरु करण्यात आल्या. तर शहरात महापालिकेच्या वतीने अशी तपासणी करण्याकरीता केंद्रही सुरु करण्यात आली होती. यातून मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. याचा फायदा अनेक रुग्ण समोर येण्यात झाला. त्यामुळे आॅगस्टमध्ये पाच हजार ९१२ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर तातडीने उपचारही करण्यात आले. यातील बहुतांश जण सौम्य लक्षणाचे रुग्ण होती. कोरोना बाधितांची संख्या आणखी वाढत जाणार आहे. त्यात अनलॉक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लातूरकरांनी कोरोना संबंधीताच्या उपाय योजनाची अंमलबजावणी करून स्वतः सुरक्षीत राहण्याची गरज आहे.
आकडे बोलतात :
महिनानिहाय बाधित झालेले रुग्ण
(संपादन-प्रताप अवचार)