corona.jpg
corona.jpg

Corona Update : लातूरात आज १७० पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा तीन हजार पार

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात गुरुवारी (ता. सहा) १७० रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार तीन झाला आहे. दरम्यान कोरोनामुळे बुधवारी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११२ झाली आहे.

लातूर जिल्हयाचा कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. ही चिंताजनक बाब बनत आहे. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. दररोज शंभर पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. लॉकडाऊऩ संपल्यानंतर तर हा आकडा मोठा राहण्याचीच भिती आहे. गुरुवारी १७० जणाना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार तीन झाला आहे. सध्या एक हजार १८५ जणांवर उपचार सुरु आहेत.

त्यात बुधवारी डोंगरशेळकी (ता. उदगीर) येथील एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱय़ांची संख्या ११२ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ७०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही सुखद बाब आहे. त्यात गुरुवारी ७५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५६, बारा नंबर पाटीवरील कोविड केअर सेंटरमधील सात, उदगीर तीन व औसा येथील नऊ जणांचा समावेश आहे.

लातूर कोरोना मिटर
एकूण बाधित --३००३
उपचार सुरु--११८५
बरे झालेले --१७०६
मृत्यू ---११२
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com