ब्रेकिंग : लातूर जिल्ह्यात कोरोनाचे चार रूग्ण आढळले : उदगीर, जळकोट, खंडाळी, बोरगाव...

हरी तुगावकर
बुधवार, 20 मे 2020

कोरोना ग्रामिण भागात शिरकाव करु लागला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६५ वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी (ता. १९) आणखी कोरोनाचे चार रूग्ण आढळले आहेत. खंडाळी आणि बोरगाव सारख्या गावात रूग्ण आढळून आले आहेत. याचा अहवाल बुधवारी मध्यरात्री आला आहे. या वरुन कोरोना ग्रामिण भागात शिरकाव करु लागला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६५ वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत मंगळवारी एकूण 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील आहे व दुसरी व्यक्ती लातूर तालुक्यातील बोरगाव येथील आहे. दोघेही 3 दिवसापूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत.

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून एकूण 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह व 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकूर येथून 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच 6 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जळकोट येथील 10 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून 8 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रिजेक्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  

लातूर जिल्हयातील असे एकूण 67 स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 4 पॉझिटीव्ह असून 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल संदिग्ध व एका व्यक्तीचा स्वॅब रिजेक्ट करण्यात आला आहे, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Corona Updates 4 Found Positive Now 65 Patients In Total