esakal | लातूर : महिलेच्या खूनातील संशयितांने केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

ढाकणी (ता. लातूर) येथील एका महिलेचा खून करून फरार असलेल्या संशयिताने शनिवारी (ता. १९) विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला.

लातूर : महिलेच्या खूनातील संशयितांने केली आत्महत्या

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : ढाकणी (ता. लातूर) येथील एका महिलेचा खून करून फरार असलेल्या संशयिताने शनिवारी (ता. १९) विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. संशयिताने विष पिल्याचे दिसून येताच त्याला मुरूडच्या ग्रामीण रुग्णालयातून लातूरला हलवण्यात आले; मात्र दुपारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे मुरूडचे (ता. लातूर) सहायक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शेतात कामाला येत नसल्याच्या कारणावरून ढाकणी येथील विनायक सौदागर जाधव (वय ६५) याने रेखा विठ्ठल सवई (वय ३५) या महिलेचा मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून १४ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता खून केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जाधव याच्यासह तिघांविरुद्ध मुरूड पोलिसांनी खून व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यातील दोघांना पोलिसांनी अटक केली होती तर विनायक जाधव हा फरार होता. त्याचा पोलिस शोध घेत असतानाच शनिवारी सकाळी त्याच्या शेतात बाजेवर विष पिलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने त्याला येथील लातूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे श्री. गोमारे यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)