esakal | लातूर : शुभमंगल `सावधान` नव्हे तर कोरोनाचे निमंत्रण; ३२ जणांना झाली लागण 
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage.jpg

लग्न कार्यात सहभागी होऊन नातेवाईकांचे मन सांभाळणे ३२ जणांना महागात पडले आहे. या सर्वांना लग्न सोहळ्यातूनच कोरोनाची लागण झाली असून तब्बल ४६ जणांना खासगी व धार्मिक कार्यक्रमातील सहभाग अंगलट आला आहे. विविध कार्यक्रमाला हजेरी लावल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.

लातूर : शुभमंगल `सावधान` नव्हे तर कोरोनाचे निमंत्रण; ३२ जणांना झाली लागण 

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या १८४ रूग्णांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग कसा झाला. याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता. सात) फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात दिली.

हे ही वाचा धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

त्यानुसार लग्न कार्यात सहभागी होऊन नातेवाईकांचे मन सांभाळणे ३२ जणांना महागात पडले आहे. या सर्वांना लग्न सोहळ्यातूनच कोरोनाची लागण झाली असून तब्बल ४६ जणांना खासगी व धार्मिक कार्यक्रमातील सहभाग अंगलट आला आहे. विविध कार्यक्रमाला हजेरी लावल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे ही वाचा : पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  


कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येते. यातूनच कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली, याचा शोध पोलिस व आरोग्य यंत्रणेकडून घेण्यात येतो. यात अनेक रूग्णांच्या बाबतीत मजेदार माहिती पुढे येत आहे. नेहमीप्रमाणे नातेवाईकांच्या तसेच जवळच्या व्यक्तीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जाणे टाळणे अनेकांना शक्य झाले नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

हे ही वाचा : सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

यातूनच ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नासाठी परवानगी देऊनही तब्बल ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अनेक लग्नात ५० पेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती लावल्याचे दिसत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या १८४ पैकी २३ व्यापारी असून ५३ जण बाहेरगावाहून प्रवास करून आलेले आहेत. २७ जणांना खासगी कार्यक्रम तर १९ जणांना धार्मिक कार्यक्रमांतून कोरोनाची लागण जाली आहे. अन्य व्यक्तींना विविध तीस कारणांमुळे कोरोनाची लागण झाल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

हे ही वाचा : घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

खासगी रूग्णालयातही उपचार

सरकारी रूग्णालयांप्रमाणे लवकरच खासगी रूग्णालयांतही कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार केला जाणार आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार मंगळवारी खासगी डॉक्टर तसेच रूग्णालयांची बैठक घेण्यात आली. यात सकारात्मक चर्चा झाली. यामुळे आठवडाभरात खासगी रूग्णालयातही कोरोना रूग्णांवर उपचार सुरू होणार आहे. अशा रूग्णालयांची यादी लवकरच प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगतिले.

हे ही वाचा : औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली   

महिला अन् वडीलांना सवलत

दुचाकीवरून डबल व ट्रिपल सीट जाणाऱ्यांविरूद्ध दोन दिवसापासून कारवाई करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने लोक नियमांचे पालन करीत असल्याचा आनंद वाटत आहे. यात डबलसीट जाण्यासाठी महिलांसोबत आता दुचाकीस्वाराच्या वडीलांनाही सवलत देण्यात आली आहे. स्वयंशिस्तीनेच कोरोनावर मात करणे शक्य आहे. सर्व व्यवहार बंद करून उलट्या मार्गाने जाणे योग्य होणार नाही, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पष्ट केले.