Good News : उदगीर तालुक्यातील ७३ कोरोनाबाधित करणार प्लाझ्मा दान

युवराज धोतरे 
Friday, 24 July 2020

कोरोनाबाधित झाल्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दहा दिवसांच्या कालावधीत बाधित रुग्णांशी संपर्क करून प्लाझ्मा देण्यासाठी तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना ठरावी. 

उदगीर (लातूर) : अत्यवस्थ असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी उपयोगी ठरणारी प्लाझ्मा थेरपी आता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने लातूर येथील ७३ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेऊन तसे संकल्प पत्रही भरून दिले. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कोरोनाबाधित झाल्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दहा दिवसांच्या कालावधीत बाधित रुग्णांशी संपर्क करून प्लाझ्मा देण्यासाठी तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना ठरावी. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

उदगीर तालुक्याचे भुमीपुत्र तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विद्यमान सदस्य रामचंद्र तिरुके यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १२ नंबर पाटी (खंडापूर परिसर) येथे असणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात दाखल करण्यात आले. तिरुके यांना कसलीही लक्षणे नव्हती. प्रकृती ठणठणीत होती. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

या काळात त्यांनी आपल्यासोबत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसोबत चर्चा केली. प्लाझ्मा दानाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. आपण स्वतः प्लाझ्मा दान करणार असल्याचे सांगितले. श्री. तिरुके यांच्या समुपदेशनान क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या १३५ पैकी ७३ कोरोना बाधितांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (ता.२४) सकाळी श्री तिरुके यांच्यासह या ७३ बाधित रुग्णांनी संकल्पपत्र भरून दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत सर्वांनी स्वखुशीने प्लाझ्मा दानाचे संकल्पपत्र भरून दिले. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

यावेळी कॉरंटाईन केअर सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, गृहपाल भोजने, योग शिक्षिका श्रीमती रामसने, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रमुख एस. एन. कुंभारे, कॉरंटाईन केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल कांबळे, अनिल वाठोडे, कैलास स्वामी, सुरेंद्र सूर्यवंशी, डॉ. दळवी आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

श्री व सौ तिरूके कोरोनामुक्त 
तालूक्याचे भूमिपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके व त्यांच्या पत्नी मंगला तिरुके यांना यशस्वी उपचारानंतर शुक्रवारी (ता.२४) सकाळी घरी पाठवण्यात आले. दहा दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर हे दांम्पत्य कोरोना मुक्त झाले आहे

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur district 73 corona positive Decision donate plasma