esakal | कोरोनाचा कहर : लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात पाच दिवसाचा 'जनता कर्फ्यू'  
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown 11.jpg

एकाच दिवसात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ सतर्क

कोरोनाचा कहर : लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात पाच दिवसाचा 'जनता कर्फ्यू'  

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या मुरूड (ता. लातूर) येथे गुरूवारी (ता. तीन) एका दिवसात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू तर १७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. काही दिवसात कोरोना रूग्णांची संख्या वाढून शंभराच्या पुढे गेल्याने आणि बहुतांश व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ग्रामस्थ सतर्क झाले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

यामुळे गावात सोमवारपासून (ता. सात) ते शुक्रवारपर्यंत (ता. १८) सलग पाच दिवस जनता कर्फ्यूचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. जनता कर्फ्यूच्या पाच दिवसाच्या काळात ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात दिवसभर फिवर क्लिनिक सुरू करून एक हजार अँटीजन किटद्वारे संशयित रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.  

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

मुरूड गावात मोठी बाजारपेठ असून उस्मानाबाद, कळंब, औसा, लातूर व अंबाजोगाई तालुक्यातील साठहून अधिक गावचे लोक येथे बाजारासाठी येतात. अनलॉकपासून बाजारपेठेत गर्दी वाढली आणि त्यासोबत गावातील रूग्णांची संख्या वाढली आहे. मागील पाच दिवसात रूग्णसंख्येत मोठी भर पडली. आतापर्यंत गावातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दोन दिवसात चौघांचा मृत्यू झाला. गुरूवारी तिघांचा मृत्यू व १७ नवीन पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर गावात खळबळ उडाली. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

रूग्णांची संख्या शंभराच्या पुढे गेली असून रूग्णांमध्ये मोठ्या संख्येने व्यापारी व व्यावसायिक आढळून आल्याने बाजारपेठ बंद करण्याच्या विषयावर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामीण रूग्णालय, पोलिस व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (ता. चार) बैठक झाली. यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात सलग पाच दिवस जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच दिवसात गावातील संशयित रूग्णांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी ग्रामपंचायतीकडून एक हजार अँटीजन किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण रूग्णालयात सकाळी दहा ते सायंकाळी सात दरम्यान फिवर क्लिनिक सुरू करण्यात येणार असून यामध्ये गावातील खासगी डॉक्टर सेवा देणार असल्याचे डॉ. दिनेश नवगिरे यांनी सांगितले.

औषध विक्रेते व डॉक्टरांवर बंधन
कर्फ्यूच्या पाच दिवसाच्या काळात औषध विक्रेते रूग्णांना ताप, सर्दी व खोकल्याच्या औषधांची विक्री करणार नाहीत. विक्री केल्यास संबंधित रूग्णांचा तपशील ग्रामपंचायतीला कळवणार आहेत. खासगी डॉक्टरही अशा आजारांचे रूग्ण तपासणार नाहीत. तपासल्यास त्याची माहिती ग्रामपंचायतीला देणार आहेत. अशा रूग्णांची ग्रामपंचायतीकडून सक्तीने तपासणी करण्यात येणार आहे. एखाद्या भागात कोरोना रूग्ण सापडल्यास त्या भागात ग्रामपंचायत दोन तासात कंटेंटमेंट झोन स्थापन करून फवारणी व अन्य उपाययोजना करणार आहेत. तसा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे मुरूडचे सरपंच अभयसिंह नाडे यांनी सांगितले.  

(संपादन-प्रताप अवचार)

loading image