
लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सोमवारी (ता.२३) पहिल्यांदाच शाळा सुरु झाल्या. जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या मात्र तुरळकच राहिली. ज्या शाळात नववीच्या वर्गात आठशे ते हजार विद्यार्थी आहेत, अशा शाळात केवळ शंभर दीडशे विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहिले. अकरावीच्या वर्गातही अशीच परिस्थिती राहिली.
लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सोमवारी (ता.२३) पहिल्यांदाच शाळा सुरु झाल्या. जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या मात्र तुरळकच राहिली. ज्या शाळात नववीच्या वर्गात आठशे ते हजार विद्यार्थी आहेत, अशा शाळात केवळ शंभर दीडशे विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहिले. अकरावीच्या वर्गातही अशीच परिस्थिती राहिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना मास्क तसेच सॅनिटायझर वापरण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालनही करण्यात आले.
कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. कोरोनाच्या संदर्भात अनलॉक सुरु झाल्यानंतर राज्य शासनाने सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यात स्थानिक प्रशासनावर शासनाने जबाबदारी टाकली होती. जिल्हा प्रशासनाने देखील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. जिल्ह्यातील ६५२ पैकी बहुतांश शाळा उघडल्या गेल्या. गेल्या दोन चार दिवसापासून शाळा निर्जंतुकीकरण करण्यात येत होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आज सकाळीच शाळांना सुरवात झाली. काही विद्यार्थी पालकाचे संमतीपत्र घेवून शाळेत दाखल झाले होते. या विद्यार्थ्यांचे शाळांच्या वतीने स्वागतही करण्यात आले. शहरातील देशिकेंद्र, केशवराज, राजस्थान, गोदावरी अशा अनेक मोठ्या शाळा आहेत. आठशे ते हजार विद्यार्थी अशा शाळातून शिक्षण घेत आहेत. या शाळामध्ये नववीच्या वर्गाला सोमवारी सुरवात झाली. यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या तुरळक राहिली. प्रत्येक शाळेत कोरोनाचा संसर्ग असल्याने खरबदारीच्या उपाय योजना राबवल्या गेल्या. पहिल्या दिवशी ऑनलाईन शिक्षण मात्र बंद राहिले आहे. जिल्हयात ६५२ शाळा पैकी ६२ शाळांच्या शिक्षकांची कोरोनाच्या संदर्भात चाचणी झाली नाही. त्यामुळे या शाळा उघडल्या गेल्या पण विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश देण्यात आला नाही. दोन दिवसाच या शाळातील शिक्षकांच्या चाचणी झाल्यानंतरच या शाळा सुरु होणार आहेत.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महाविद्यालयात देखील विद्यार्थी संख्या कमीच
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्गही आज सुरु झाले. शहरातील महाविद्यालयातील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमीच राहिली. महाविद्यालयात रांगेत उभे करून विद्यार्थ्यांची तपासणी करून आतमध्ये सोडले जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. महाविद्यालयात देखील सर्व उपाय योजना करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये सुरु झाली असली तर हजारो पालक मात्र वेट ॲण्ड वॉचच्याच भूमिकेत आहेत. दरम्यान शिक्षणाधिकारी दिगंबर उकिरडे यांनी शहरातील मोठ्या शाळांना भेटी देवून पाहणी केली.
(संपादन-प्रताप अवचार)