लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग ठरतोय 'राजकिय मार्ग' 

अविनाश काळे
Tuesday, 1 December 2020

माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांनी मार्गासाठी पाठपुरावा केल्याची फेसबुकवर केली पोस्ट ; दैनिक सकाळच्या वेब पोर्टलने दखल घेतल्याचा केला उल्लेख

उमरगा (उस्मानाबाद) : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ झाल्याचे चित्र दिसत असले तरी रेल्वे मार्गापेक्षा "राजकिय मार्गा" ची चर्चा होत आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मुंबई व सोलापूर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या पथकानी सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दरम्यान लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले होते. रेल्वे मार्गासंदर्भात माध्यमांकडुन आपण केलेल्या प्रयत्नाचा उल्लेख होत नाही. दैनिक सकाळच्या वेब पोर्टलने मात्र उल्लेख केल्याचे असून याबाबत भाजपाचे तत्कालिन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तत्कालिन खासदार सुनिल गायकवाड यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते म्हणाले की, लातूर ते गुलबर्गा हा १४५ किलो मीटर अंतराच्या नवीन रेल्वे रेल्वे मार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच एप्रिल २०१७ रोजी निवेदन दिले होते. आपल्या मागणीप्रमाणे लातूर गुलबर्गा नवीन रेल्वे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणार आहे. लातूर शहर हे शैक्षणिक, औद्योगिक हब झाले आहे, नव्याने होणाऱ्या लातूर - गुलबर्गा हा रेल्वे मार्ग हा औसा मार्गे जाणार आहे. सध्या सुरु असलेल्या चर्चेविषयी अधिक भाष्य करण्यापेक्षा हा मार्ग लवकरच पूर्ण व्हावा ही अपेक्षा आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान रेल्वे मार्गासंदर्भात निलंगा, औश्याचे लोकप्रतिनिधी चर्चेत आले आहेत. मात्र ज्या मार्गावरुन रेल्वे जाणार आहे त्या उमरगा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी चर्चेत दिसत नाहीत. रेल्वे मार्ग औसा, निलंगा, शिरूरअनंतपाळ हे अजून निश्चित नाही. रेल्वे उमरग्याहुन जाणार आहे, मात्र हा मार्ग नेमका कोणता असावा या बाबतची चर्चा होणे अपेक्षित आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Gulbarga railway line to be political route