लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु!

राम काळगे
Monday, 23 November 2020

निलंगा मतदारसंघातून रेल्वे धावणार असल्याने ड्रिम प्रोजेक्ट लवकरच साकारताना दिसणार आहे. निलंगा मतदारसंघातून हायवे आणि रेल्वे हा आपला ड्रिम प्रोजेक्ट असल्याचे माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगीतले आहे.

निलंगा (लातूर) : लोकसभा निवडणूकीच्या काळात निलंग्यात प्रचारासाठी आलेले रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी निलंगा मतदारसंघातील नागरिकांना गुलबर्गा लातूररोड हा नवीन रेल्वे मार्ग करणार आहोत, असे आश्वासित केले होते. तर दिलेले आश्वासन त्यांनी पाळले असून या मार्गाला मंजुरी देखील दिली. त्याही पलिकडे जाऊन रेल्वेचे व्यवस्थापक सुरेशचंद्र जैन यांनी या मार्गाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. हा मार्ग लातूर स्टेशन, भातांगळी,  शिरूरअनंतपाळ, निलंगा, उमरगा, आळंद नंतर गुलबर्गा असा असणार आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

निलंगा मतदारसंघातून रेल्वे धावणार असल्याने ड्रिम प्रोजेक्ट लवकरच साकारताना दिसणार आहे. निलंगा मतदारसंघातून हायवे आणि रेल्वे हा आपला ड्रिम प्रोजेक्ट असल्याचे माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगीतले आहे. लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लोकसभा निवडणूकीत निलंगा येथे आलेले रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या समोर जोपर्यंत निलंगा मतदारसंघातून रेल्वे जाणार नाही. तोपर्यंत शिरुर-अनंतपाळ तालुक्यात सत्कार स्विकारणार नाही असे वचन दिल्याचे संभाजीरावांनी आपल्या भाषणात सांगितले. तेव्हा रेल्वेमंत्री गोयल यांनी संभाजीराव पाटील लातूरसाठी रेल्वे बोगी कारखाना मागीतला तो दिला. आता मतदारसंघात रेल्वे मागितली तेही देणारच असा शब्द त्यांनी दिला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याच्या पुर्तीसाठी एक पाऊल पुढे जात गुलबर्गा ते लातूर रोड या दरम्यान 187 किलोमीटर अंतरावरील रेल्वे ट्रॅक निर्मितीसाठीच्या सर्वेचे काम लवकरच सुरू होणार असून तसे पत्र रेल्वे विभागाने काढले असल्याने मतदारसंघातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. रेल्वे आणि हायवे मुळे दळणवळणाचा वेग वाढीस लागला आहे. या भागातील विकासालाही यामुळे मदत व चालना मिळणार आहे. हायवे प्रमाणे रेल्वेचेही काम तत्काळ मार्गी लागावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान निलंगा मतदार संघातील हायवे मिळाला असला तरी रेल्वेही लवकरच मिळणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Gulbarga railway line Soon survey