
लातूर-गुलबर्गा मार्ग लामजनामार्गे नेण्याची रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी
लातूर : रेल्वे खात्याने लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पथकही येथे आले. पण, लातूरच्या खासदार, आमदारांनी माझं गाव, माझा मतदारसंघ अशी भूमिका घेत या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेऐवजी लोकहितासाठी लातूर, लामजना, किल्लारी मार्गे गुलबर्गा असे सर्वे करावा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
रेल्वे मार्ग सुरू होणे व तो अस्तित्वात येणे यासाठी बराच काळ जातो. रेल्वे विभाग नवीन रेल्वे मार्ग सुरू करताना केवळ रेल्वे प्रवासी यांचा विचार करते असे नाही तर त्या मार्गामुळे माल वाहतूक किती होईल तसेच परिसरात उद्योगधंदे किती आहेत या मूलभूत बाबींचाही विचार करते. लातूर हे मराठवाड्यातील प्रगत शहर आहे. देशातील एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक केंद्र आहे. शेतीमालाची मुख्य बाजारपेठ आहे. तेल, डाळी, साखर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगीचा कारखाना लातूर येथे सुरू केलेला आहे. या सर्व बाबीचा विचार केला असता लातूर रोड ते गुलबर्गा या मार्गाऐवजी जास्ती जास्त महसूल देणारा, प्रवाशांना सोईचा असणारा, कमी खर्चिक, अंतर कमी असणार रेल्वे मार्ग या बाबीचा विचार करून लातूर ते लामजना, किल्लारी-गुलबर्गा या मार्गाचे सर्वे करावा, अशी मागणी या संघटनेने केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या सोबतच लातूर रोड ते नांदेड या रेल्वे मार्गाचे कामकाज तत्काळ सुरू करावे, अशीही मागणीही संघटनेचे ॲड. मनोहरराव गोमारे, ॲड. उदय गवारे, अशोक गोविंदपूरकर, मुर्गाप्पा खुमसे, राजेंद्र वनारसे, मोहन माने, सूर्यप्रकाश धूत, श्यामसुंदर मानधना, बसवंत भरडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, डॉ. बी. आर. पाटील, ॲड. विजय जाधव, इंदू पाटील, किरण पवार, रईस टाके, दिनेश गिल्डा, धीरज तिवारी, रामेश्वर पुनपाळे, ॲड. संतोष गिल्डा, संजय पाटील, प्रा. सुधीर अनवले, संजय मोरे, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. वसंत उगले, ॲड. भालचंद्र कवठेकर, ॲड. शशिकांत भोसले, मोहसीन खान, अशोक वरयानी, श्रीनिवास आकनगिरे, शिवाजी सुरवसे, किरण माने यांनी केली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)