
येथील एकंबेकर हाविद्यालयात होणारी ही पहिलीच मराठवाडा इतिहास परिषद असून यानिमित्ताने मराठवाड्याच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे
उदगीर (लातूर): येथील (कै) बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात मराठवाडा इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यामध्ये ९ व १० एप्रिलला उदगीरात मराठवाडा चाळीसावी इतिहास परिषद घेण्याचा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. अनंत शिंदे यांनी दिली आहे.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक डॉ. सोमनाथ रोडे, संस्थचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील, परिषदेचे अध्यक्ष डॉ.झाकीर पठाण , उपाध्यक्ष डॉ. नारायण सुर्यवंशी, सचिव डॉ. विजय पांडे, सदस्य डॉ.शीला स्वामी, डॉ.काशीनाथ चव्हाण, डॉ.अरविंद सोनटक्के, डॉ.विलास जाधव, डॉ.सर्जेराव बनसोडे, डॉ.बाबासाहेब पिसे तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
लग्नाच्या जेवणातून १०५ वऱ्हाडींना विषबाधा, लातूरच्या वाढवण्यातील धक्कादायक घटना
येथील एकंबेकर हाविद्यालयात होणारी ही पहिलीच मराठवाडा इतिहास परिषद असून यानिमित्ताने मराठवाड्याच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे. मराठवाड्यातील सर्व तज्ञ इतिहासकार या वेळी उपस्थित राहणार असल्याने उदगीरकरांना इतिहासकारांची मेजवानी मिळणार आहे.
परिषदेच्या बैठकीमध्ये मागील झालेल्या इतिहास परिषदेचा आढावा घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. 40 वी मराठवाडा इतिहास परिषद कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर येथे ९, १० एप्रिल २०२१ रोजी घेण्याचे एकमताने ठराव घेण्यात आला.
औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!
या बैठकीमध्ये परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ.शिंदे यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
(edited by- pramod sarawale)