
देशातच नव्हे तर आशिया खंडात प्रथमच लातुरामध्ये इतिहास घडणार आहे.
लातूर : येथील बालकलाकार सृष्टी जगताप सलग २४ तास लावणी सादर करून आशिया रेकॉर्डमध्ये नवा विक्रम बनवणार आहे. आशिया खंडात प्रथमच मराठमोळी लावणीचा आशिया रेकॉर्ड नवा विक्रम करून मराठमोळी लावणी सातासमुद्रापार पोहोचवण्याचा तिचा मानस आहे. त्या दृष्टीने तीने प्रयत्न सुरु केले आहेत. देशातच नव्हे तर आशिया खंडात प्रथमच लातुरामध्ये इतिहास घडणार आहे. तिच्या रूपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार आहे. नॉन स्टॉप २४ तास लावणीनृत्य करून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड स्थापित करणार आहे.
औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!
सृष्टी सुधीर जगताप ही पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे नववीच्या वर्गात शिकत आहे. तिने अनेक कलाप्रकारात आपले प्रावीण्य दाखवले आहे. तिने किल्लारी फेस्टिवल, लातूर फेस्टिव्हल, अष्टविनायक अशा नामांकित राज्य व देशपातळीवरील नृत्य व अभिनय स्पर्धेत तिने ७१ पुरस्कार मिळवले आहेत. `ती फुलराणी`, `मी जिजाऊ बोलते`, `मी सावित्रीबाई फुले बोलते`, `मुलगी वाचवा मुलगी शिकवा` असे एकपात्री प्रयोग करून तिने समाज प्रबोधन केले आहे.
लग्नाच्या जेवणातून १०५ वऱ्हाडींना विषबाधा, लातूरच्या वाढवण्यातील धक्कादायक घटना
अंगावर शहारे आणणारे पोवाडा गायन करते. अशी हरहुन्नरी बालकलाकार येत्या २६ जानेवारीला दुपारी दोन वाजल्यापासून २७ जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लावणी नृत्य सादर करून आपले आशिया बुक रेकॉर्ड स्थापित करणार आहे. हा कार्यक्रम दयानंद सभागृहात येथे होणार आहे. याच कार्यक्रमात `एक टप्पा आउट`चे सुपरस्टार बालाजी सूळ चौफेर कॉमेडी करणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी भेट देऊन चिमुकल्या सृष्टीला प्रोत्साहन देऊन मनोबल वाढवावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संपादन - गणेश पिटेकर