esakal | पदभार स्विकारताच पोलिस अधीक्षक पिंगळे रस्त्यावर, उदगीरात मोटरसायकलवर गस्त
sakal

बोलून बातमी शोधा

udgeer police.jpg

जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी उदगीर शहराला भेट दिली. शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गजानन पाटील यांच्या दुचाकीवरून येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उदगीर बाबांचे दर्शन घेतले व खाजा बादशहा दर्ग्याला भेट देऊन चादर चढवली. 

पदभार स्विकारताच पोलिस अधीक्षक पिंगळे रस्त्यावर, उदगीरात मोटरसायकलवर गस्त

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : लातूरचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुरुवारी (ता.२२) सायंकाळी सातच्या दरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोटर सायकलवर गस्त घातली. अचानक मोटार सायकलवर साहेब निघाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे यांनी उदगीर शहराला भेट दिली. शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गजानन पाटील यांच्या दुचाकीवरून येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उदगीर बाबांचे दर्शन घेतले व खाजा बादशहा दर्ग्याला भेट देऊन चादर चढवली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


उदगीर शहरातील ऐतिहासिक सांस्कृतिक व गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेण्यासाठी शहरातील रस्त्यावरून कुठल्याही बंदोबस्ताशिवाय दुचाकीवर फिरून माहिती घेतली. चौबारा रोड, किल्ला रोड, सराफ लाईन, कॉर्नर चौक, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, शाहू चौक, देगलूर रोड, मोंढा रोड, डॅम रोड, उमा चौक, फुलेनगर, गांधी नगर, पत्तेवार चौक, हनुमान कट्टा या भागात फिरून श्री पिंगळे यांनी गस्त घातली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यादरम्यान गुन्हे घडणारी ठिकाण, अवैध धंदेवाल्यांचे केंद्र, गुटखा, अवैध दारू विक्रीची ठिकाणे, मटका चालणाऱ्या ठिकाणांची पाहणी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कोणत्या रस्त्यावरून कोठे येत आहेत हे कोणालाही माहिती नसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

एकत्रितपणे काम करणे आवश्यक

उदगीर शहरातील एकंदरीत परिस्थिती पाहिली असता शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे, हातगाडे, बेशिस्त वाहनधारक, रस्ते, नाल्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहेत. यासाठी नगरपालिका, पोलीस प्रशासन व शासनाच्या संबंधित विभागाने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. येत्या काळात आमची जबाबदारी आम्ही केव्हाही पार पडण्यासाठी तयार आहोत. चांगले काम करू अशी ग्वाही पोलीस अधीक्षक श्री पिंगळे यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. 

(संपादन-प्रताप अवचार)