esakal | लातूरला भाजी मार्केटला शिस्त, ईदगाह मैदानही ताब्यात

बोलून बातमी शोधा

Latur News

संचारबंदीत फळे व भाजीपाला खरेदीसाठी लोकांच्या होणाऱ्या गर्दीला आवर घालून त्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी (ता. २८) भक्कम निर्णय घेतले. यात भाजीपाला मार्केटला शिस्त लावल्यानंतर दुपारी दयानंद महाविद्यालयाचा परिसर व शिवाजी चौकातील ईदगाह मैदान ताब्यात घेतले.

लातूरला भाजी मार्केटला शिस्त, ईदगाह मैदानही ताब्यात
sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : संचारबंदीत फळे व भाजीपाला खरेदीसाठी लोकांच्या होणाऱ्या गर्दीला आवर घालून त्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी (ता. २८) भक्कम निर्णय घेतले. यात भाजीपाला मार्केटला शिस्त लावल्यानंतर दुपारी दयानंद महाविद्यालयाचा परिसर व शिवाजी चौकातील ईदगाह मैदान ताब्यात घेतले. दोन्ही ठिकाणी फळे व भाजीपाला विक्रीसाठी सुरक्षित सामाजिक अंतरानुसार आणखी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

जुन्या गुळमार्केट परिसरात असलेल्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज सकाळी सहा ते सात दरम्यान सौदे निघून त्यानंतर ठोक व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना फळे व भाजीपाला विक्री करतात. किरकोळ विक्रेते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन व मार्केटच्या परिसरात भाजीपाला व फळांची विक्री करत होते. ठोक (होलसेल) विक्रीसाठीच्या भाजीमार्केटमध्ये गेल्या काही वर्षात कमी दराने भाजी व फळे खरेदीसाठी नागरिकांनीही गर्दी करण्यास सुरवात केली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करूनही फळे व भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी काही केल्या कमी होत नव्हती. 

कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात  

यावर उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव व बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी व्यापाऱ्यांच्या सहभागाने उपाय शोधला. त्यानुसार शनिवारी सकाळी सौद्यात सहभागाला पात्र ठोक नऊ व्यापाऱ्यांनाच मार्केटमध्ये थांबण्याची परवानगी दिली. त्यानंतर बाजारपेठ बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांसाठी कव्हा रोडवर बंद दूकानांसमोर सुरक्षित सामाजिक अंतरानुसार व्यवस्था करून देत जागा वाटप केले. 

याचा परिणाम शनिवारी भाजीपालामार्केटमधील गर्दी काही क्षणात संपुष्टात आली. असाच प्रयोग दयानंद गेट परिसरातील भाजीपाला मार्केटसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी ईदगाह मैदान व दयानंद महाविद्यालयाचा परिसर ताब्यात (अधिग्रहित) घेण्यात आला असून त्या ठिकाणी फळे व भाजीपाला विक्रेत्यासाठी सुरक्षित सामाजिक अंतरानुसार व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे भाजीपाला व फळे खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर चांगलेच नियंत्रण येणार आहे.

उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी