अमित देशमुखांच्या शेतात लपलाय बिबट्या, दोन पिंजरे लावले, सर्च ऑपरेशन सुरु

Leopard
Leopard

लातूर : शहरापासून जवळच असलेल्या बाभळगावात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री अमित देशमुख यांच्याच शेतात हे बिबटे आढळले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ही घटना समजताच वन विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी 2 पिंजरे लावले आहेत. शिवाय, ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे. बाभळगावात बिबट्या दिसला आहे, असा दूरध्वनी रविवारी सकाळी सहा वाजता लातुर ग्रामीण पोलीस चौकीत आला. पोलिसांनी ताततीने घटनास्थळी धाव घेतली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्यानंतर वनविभागालाही कळविण्यात आले. 20 जणांची टीम तातडीने बाभळगावात पोचली. त्यांना या भागात एका बाबट्याच्या पावलांचे ठसे आढळुन आले. त्यामुळे त्यांनी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी या भागात 2 पिंजरे लावले आहेत. वन परिमंडल अधिकारी एन. एस. पचरंडे आणि एम. वाय. पवार यांनी याबाबतची माहिती 'सकाळ'ला दिली.

ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. या भागात ऊस आणि बांबू आहे. बिबट्या येथे लपलेला असू शकतो. त्यामुळे या भागात आम्ही दोन पिंजरे लावले आहेत. आणखी एक पिंजरा लवकरच लावला जाणार आहे. आम्ही सकाळपासून या भागात गस्त घालत आहोत. पण, अद्याप बिबट्या आढळला नाही. त्यामुळे आम्ही ड्रोनची मदत घेणार आहोत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com