ड्रोनने तीन दिवस शोधूनही सापडला नाही, आता हरणाचा पाडला फडशा

हरी तुगावकर
Sunday, 10 May 2020

बाभळगाव (ता. लातूर) येथे काही दिवसापूर्वी बिबट्या दिसून आला होता. तीन चार दिवस वनविभागाने शोध मोहिम हाती घेऊनही बिबट्या पण तो काही मिळून आला नव्हता. मात्र चिकलठाणा (ता. लातूर) येथे शनिवारी (ता.९) रात्री या बिबट्याने एका हरणाचा फडशा पाडल्याचे दिसून आले.

लातूर : बाभळगाव (ता. लातूर) येथे काही दिवसापूर्वी बिबट्या दिसून आला होता. तीन चार दिवस वनविभागाने शोध मोहिम हाती घेऊनही बिबट्या पण तो काही मिळून आला नव्हता. मात्र चिकलठाणा (ता. लातूर) येथे शनिवारी (ता.९) रात्री या बिबट्याने एका हरणाचा फडशा पाडल्याचे दिसून आले. त्यामुळे या बिबट्याचा ग्रामीण भागात वावर सुरु असल्याचे आता स्पष्टच झाले आहे. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वनविभागाचे एक पथक रविवारी (ता.१०) सकाळी चिकलठाण्याकडे रवाना झाले आहे. बाभळगाव येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतात पाच दिवसापूर्वी बिबट्याचे ठसे उमटले होते. त्यानंतर वनविभागाने बाभळगाव परिसरात पिंजरेही लावले. ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम घेतली. तीन चार दिवस ही मोहिम सुरु होती.

दरम्यानच्या काळात बाभळगावजवळ असलेल्या पानचिंचोली, चामेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरीकांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. वनविभागाने मात्र बाभळगाव परिसरातून हा बिबट्या गेल्याचे गृहित धरुन शोध मोहिम थांबवली होती. पण चिकलठाणा येथे शनिवारी (ता.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास संतोष चिमकुरे व बाळू चिमकुरे यांना बिबट्या दिसला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यांनी गावात येवून तसेच इतर आखाड्यावर याची माहिती दिली. पण त्यांचे कोणी मनावर घेतले नाही. पण रविवारी सकाळी या गावच्या शिवारात असलेल्या एका शेतात बिबट्याने फडशा पाडलेले एक मृत अवस्थेतील हरण नागरीकांना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली असून गावात भीतीचे वातावरण आहे. शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत, अशी माहिती गावातील रमेश पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ऊसाच्या शेतातून नदीमार्गाने गेल्याची शक्यता

दरम्यान वनविभागाचे वनरक्षक महेश पवार यांचे एक पथक चिकलठाण्याकडे रवाना झाले आहे. बाभळगाव परिसरात आम्ही शोध मोहिम घेतली होती पण तेथे बिबट्या सापडला नाही. चिकलठाण्याला गेल्यानंतर तेथे पाहणी केल्यानंतरच तेथे बिबट्या आला होता का हे कळू शकणार आहे. ऊसाच्या शेतातून तसेच नदीच्या मार्गाने तो गेला असावा याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 

Leopard Killed Deer Latur News CoronaVirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Killed Deer Latur News