esakal | पाचोड परिसरात बिबट्याची दहशत, वनविभागाचा मात्र पुन्हा येऊ म्हणून काढता पाय!
sakal

बोलून बातमी शोधा

pachod.jpg

पाच दिवसापूर्वी पाचोड पासुन दहा किलोमिटर अंतरावरील जामखेड शिवारात बिबट्याने महिलेवर केलेल्या हल्ल्यात महीला ठार झाल्याच्या घटनेमूळे सर्वत्र बिबट्याची दहशत कायम असल्याचे पाहवयास मिळते. या घटनेनंतर  जामखेडसह परिसरात शेतावरील शेतकरी -शेतमजुरांसह नागरिकांत दहशत पसरली असून रविवारी (ता. आठ) डोणगाव दर्गा शिवारात बिबट्या शेतमजूराच्या दृष्टीस पडला.

पाचोड परिसरात बिबट्याची दहशत, वनविभागाचा मात्र पुन्हा येऊ म्हणून काढता पाय!

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद) : चार दिवसापासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरुन शेत शिवार ओस पडले आहे. शेतावर कामांसाठी गेलेल्या माहिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी पसरल्याने महीला- मुले शेतातील कामे अर्धवट सोडून गावांकडे परतली आहे. बिबट्याच्या दहशतीपोटी शेतामध्ये कामे करण्यास कोणी धाडस करण्यास तयार नसल्याने ऐन शेतकामाच्या लगबगीच्या दिवसांत शेत शिवार ओस पडल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) सह रांजनगाव दांडगा, मुरमा, कोळी बोडखा, खादगाव, सोनवाडी परिसरात पाहवयास मिळते. यासंबंधी बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच वनविभागाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेऊन बिबटयाच्या ठशाची पाहणी केली असुन सर्वत्र ग्रामस्थ, वन विभाग जागता पहारा देत आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पाच दिवसापूर्वी पाचोड पासुन दहा किलोमिटर अंतरावरील जामखेड शिवारात बिबट्याने महिलेवर केलेल्या हल्ल्यात महीला ठार झाल्याच्या घटनेमूळे सर्वत्र बिबट्याची दहशत कायम असल्याचे पाहवयास मिळते. या घटनेनंतर  जामखेडसह परिसरात शेतावरील शेतकरी -शेतमजुरांसह नागरिकांत दहशत पसरली असून रविवारी (ता. आठ) डोणगाव दर्गा शिवारात बिबट्या शेतमजूराच्या दृष्टीस पडला. ही बातमी परिसरात पसरताच महिलासह,नागरिक शेतातील कामे सोडून घरी परतले. मगंळवारी( ता. दहा) केकत जळगाव, सोनवाडी, खादगाव परिसरात राञीच्या वेळी काही नागरिकांना पुलाखाली बिबट्या जाताना दिसला. तर  बुधवारी ( ता.११) सकाळी रांजनगाव दांडगा शिवारात  बिबट्या दोन बछड्यांसोबत मुक्त संचार करतांना कापुस वेचणी करणाऱ्या मजुरांच्या दृष्टीस पडला. ही बातमी वेळातच हवेसारखी परिसरात पसरली अन् शेतामध्ये कापूस वेचणाऱ्या महिलांनी हातातील चालु कामे सोडून गावांकडे धाव घेतली. परिसरात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढून सर्वत्र बिबट्याचीच चर्चा कानी पडत आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतात काम करण्या साठी गेलेले शेतमजूर भितीपोटी दुपारीच घरी परतल्याने शेतातील सर्व कामे खोळंबली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


बिबटयाच्या हल्ल्याच्या भीतीने रहिवाशांना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.शेतवस्त्यां वर पाळीव कुत्री, बकऱ्या, कोंबड्या, गायी, म्हशींची सहज शिकार मिळत असल्याने बिबटे मानवी वस्त्यां- कडे आकर्षिले जात असल्याचे सांगितले जाते. पाचोड परिसरातील अनेक गावात बिबट्या दिसल्याच्या बातम्या येत असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक गावांत पिंजरा लावून बिबट्या पकडण्याच्या प्रयत्न केला. मात्र वनविभागाला अपयश आले. 'आज इथे तर उद्या तिथे' बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्याने वनविभागही संभ्रमावस्थेत असून त्यांनाही बिबट्याचा नेमका शोध कसा घ्यायचा हा प्रश्न पडला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गंगथडी भागातील गावात बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्यांना आता राजनगावातून बळ मिळाले असून, बुधवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या सलामा शेख यांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. पाचोड-बालानगर रस्ता ओलांडून बिबट्या बाजुच्या शेतात जात असल्याचे अनेक जणोनी पाहीले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.  कामानिमित्त शेतात गेलेल्यांनी याचा धसका घेत तात्काळ घरचा रस्ता धरला, बिबट्या आल्याची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक गोरक्ष खरड, भगवान धांडे, जगन्नाथ उबाळे, फिरोझ बरडे आदीसह रांजनगाव, केकत जळगाव येथे धाव घेऊन नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देत वन विभागाला माहीती कळविली. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या पथकासह सदरील गावांस भेट देऊन बिबट्याच्या पाऊलखूणा (ठसे) शोधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा येऊ म्हणून काढता पाय घेतला.

वनविभागाने सिरियस व्हावे 
सध्या बिबट्याचा मुक्काम रांजनगाव, लिंबगाव, खादगाव शिवारातच असण्याची शाश्वती असून वन विभागाने तातडीने या बिबट्याचा शोध घेण्याची तसदी घ्यावी, केवळ उटावरुन शेळ्या हाकू नयेत, अशी मागणी सरपंच रियाज पटेल, शागीर पटेल, अफसर पटेल, माजी सरपंच आजिज पटेल यांनी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image