esakal | Coronavirus : लोहारा तालुक्यात ४० बाधित, दोघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील ४८ तासात ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

Coronavirus : लोहारा तालुक्यात ४० बाधित, दोघांचा मृत्यू 

sakal_logo
By
नीलकंठ कांबळे

लोहारा (उस्मानाबाद) : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील ४८ तासात ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ४७३ वर पोचली आहे. तर शुक्रवारी (ता.२५) यात दहा नव्या रूग्णांची भर पडली आहे.  

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आरोग्य विभागाने तालुक्यातील सास्तूर, माकणी, लोहारा या तीन ठिकाणी कोरोनाची तपासणी केंद्र आहेत. तपासणीची गती वाढवल्याने कोरोनाबाधित रूग्णांचे त्वरीत निदान होऊ लागले आहेत. मागील ४८ तासात ४० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील अचलेर येथील ६१ वर्षीय महिलेचा पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना त्रास होऊ लागल्याने सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुक्यातील सालेगाव येथील ४२ वर्षीय नागरिकाचा बुधवारी (ता.२३) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. पुणे येथून सालेगाव येथे आले होते. चार दिवसापूर्वी त्यांना ताप, खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यांना दाळींब (ता.उमरगा) येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी उपचार घेण्याचे टाळले. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मंडले यांनी दिली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यात तालुक्यातील रेबेचिंचोली येथे चार रूग्ण तर सास्तूर, लोहारा, सालेगाव, कोंडजीगड येथे प्रत्येकी एक व होळी येथे दोन कोरोनाबाधित रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण ४७३ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील ३३५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२७ रूग्ण उपचार घेत आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)