esakal | डोळ्यात उरलं फक्त पाणी ! जळकोट तालुक्यात ९७९ हेक्टर ऊस झाला भुईसपाट! 
sakal

बोलून बातमी शोधा

Jalkot Us.jpg

आडवा पडलेला ऊस उंदीर करु लागले फस्त.

डोळ्यात उरलं फक्त पाणी ! जळकोट तालुक्यात ९७९ हेक्टर ऊस झाला भुईसपाट! 

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (लातूर) : गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने साठवण तलाव ओहरफुल्ल झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ९७९ हेक्टरवर ऊसाची लागवड केली होती. एक महिन्यात ऊस कारखाने घेऊन जाणार होते. पंरतू परतीच्या वादळी पाऊसाने ऊभा ऊस भुईसपाट झाल्याने ऊस उत्पादकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


जळकोट तालुका हा डोंगराळ भाग असल्याने या भागात गेल्या तीन वर्षांपासून पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पन्नास हेक्टरवरही ऊसाची लागवड केली नव्हती. पंरतू गेल्यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने साठवण व पाझर तलाव हाऊसफुल्ल झाले होते. पाणीसाठा उपलब्ध असल्याने  कंरजी, रावणकोळा, कुणकी, अतनुर, मंगरुळ, बेळसांगवी, सोनवळा या भागातील शेतकऱ्यांनी तब्बल ९७९ हेक्टर ऊसाची लागवड केली. सुरूवातीला ऊसाचे बेने आणून शेतात लागवण केली. यावर्षी सुरुवातीपासून पाऊस चांगला असल्याने ऊसाची वाढही चांगल्या प्रकारे झाली होती. ऊस चौदा ते पंधरा काड्यांवर असल्यामुळे उंची वाढली होती. परतीच्या पावसाच्या अगोदर वादळी वारे होऊन ऊस आडवा पडला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आढवा ऊस उभे करण्यासाठी राञ दिवस मेहनत घेऊन ऊस उभे केले होते. त्यामुळे पैसा व वेळ वाया गेला. दरम्यान मागील सहा सात दिवसांपूर्वी वादळी वाप्यासह तुफान पाऊस झाला. त्यामुळे ऊभा ऊस भुईसपाट झाला. परतीचा पाऊस राञी झोडपत असल्याने शेतकप्यांना कसलीही कल्पना नव्हती. सकाळी उठून शेतात गेल्यानंतर पाच -पाच एकरामधील ऊस आडवा पडून शेत भुईसपाट दिसत होते. एकवेळा आडवा पडलेला ऊस उभा करुन आणि त्यांची जोपसना करण्यासाठी लागलेला खर्च यातच शेतकप्यांचा खिशा रिकामा झाला होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे दुसरी वेळेस पडलेला आडवा ऊस उभे करण्यासाठी पैसे आणयाचे कुठून हा प्रश्न ऊस उत्पादक शेतकप्यापुढे पडला आहे. सध्या शेतात ऊस आडवा आसल्याने त्यांच्या मागे आता उंदराचे कळप लागल्याने आडव्या ऊसाचे नुकसान होत आहे. ऊसातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा ऊस उत्पादकांची होती. पंरतू परतीच्या पावसाने आशेवर पाणी फिरले आहे. आदी खरिपातील मुग, उडीद, सोयाबीन गेले. आता ऊसाचीही नासाडी होत असल्याने जगाचा पोशींदा जगावा कसा असा प्रश्न पडला आहे.
 

ऊस लागवड करण्यासाठी हेक्टरी तीस हजार रूपये खर्च झाला आहे. त्यात बेने, खुरपणी, खत, लागवड आदीवर खर्च झाला आहे. ऊभा ऊस असता तर एकरी चाळीस टन ऊस निघत होता.पंरतू आता ऊस आडवा पडल्याने ऊसाला पाणी व्यवस्थित पोहचत नाही. उंदीर मागे लागल्यावर एकरी वीस टन सुद्धा ऊस हाताला लागणार नाही. शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. - सत्यवान पाटील, ऊस उत्पादक शेतकरी. 


तालुक्यात अनेक ठिकाणी परतीच्या पाऊसामुळे उभा ऊस आडवा पडला आहे.कृषि विभागाकडून पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येत आहे.नजरचुकीने ऊसाचे पंचनामे राहिल्यास शेतकप्यांनी तालुका कृषि विभागाला संपर्क करावा -आकाश पवार तालुका कृषि अधिकारी जळकोट.

(Edited By Pratap Awachar)