पाहणी, पंचनामे झाले; मदत कधी? जालन्यात एक लाख सात हजार हेक्टरचे नुकसान! 

उमेश वाघमारे 
Friday, 16 October 2020

  • जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार एक लाख सात हजार ३०२.६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान. 
  • कोरोनानंतर आतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोलमडले आर्थिक कंबरडे. 

जालना : यंदा जालन्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतात उभ्या पिकांवर पावसाने पाणी फेरले आहे. अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या पाहणीचे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी ही दौरे केले. तसेच जिल्हा प्रशासनाने पंचनामे ही उरकले. मात्र, अद्यपी शासनाकडे मदतीचा हात देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाहणी, पंचनामे झाले; आता मदत कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी दरवर्षी मेटाकुटीला येतो. जालना जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झाले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. यंदा जुन महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिके जोमात आले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांसह फळबागा कोमात गेल्या आहेत. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शेताच्या बाधांवर जाऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यांनाही आता अनेक दिवस लोटले आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ही अतिवृष्टी झालेल्या पिकाचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करत एक लाख सात हजार ३०२.६१ हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टी फटका बसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. हे पंचनामे पूर्ण करून आज दहा दिवस लोटले आहेत. मात्र, शासनाकडून अद्यापी एक दमडीची मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जालन्यासह मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झाला असताना त्याला धीर देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य शासन सध्या तरी बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाईल, असे सांगीतले जात असले तरी ती मदत कधी आणि किती केली जाणार हे सांगण्यास कोणीही तयार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे या राज्य शासनाच्या विलंब धोरणामुळे बळीराजाचा बळी जाऊ नये, ही अपेक्षा. 

 

घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन तुरीचे प्रचंड नुकसान झाले. या शासनाने या नुकासानीची भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी, 
- दिलीप आढाव, शेतकरी घनसावंगी  

यंदा पावसाळ्यात अतिवृष्टीने मुगाचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस हातातून गेला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्याच्या हाती काही आले नाही. परिणामी शेतात केलेला खर्चा एेवढे ही उत्पन्न मिळाणार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने तत्काळ आर्थिक मदत दिली पाहिजे. सुरेश नाईक, शेतकरी 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of one lakh seven thousand hectares Jalna news