
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या प्रेमवीर झिशान सिद्दकी याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. झिशानला उस्मानाबाद पोलीसांच्या हाती न देता तिथेच खटला चालविण्यात आला आहे. गुजरात पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कलम ३ आणि १८८ प्रमाणे अटक करण्यात आले आहे. झिशान खरच मुलीच्या प्रेमात पडला होता का अजून काही हेतू होता याचा तपास करण्यासाठी उस्मानाबाद पोलिसांना झिशानचा ताबा दिला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता झिशानचा गुजरातचा मुक्काम वाढल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाने जामिन दिल्यानंतरच झिशानला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उस्मानाबाद शहरातील खाजा नगरमध्ये राहणारा झिशान सलीम सिध्दीकी हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याचे सबंध एका पाकीस्तानी मुलीशी आले होते. संवाद सुरु झाला त्यातून पुढे प्रेम झाले. प्रेमात एवढा पुढे गेला की, त्याला दोन्ही देशाच्या सिमेचा व सबंधाचाही विसर पडला. ११ जुलै रोजी घरतून गायब झाला होता. त्याची रितसर तक्रारही त्यांच्या कुटुंबियानी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
सध्या लॉकडाऊन तसेच जिल्हाबंदी असल्याने हा तरुण चक्क मोटारसायकल घेऊनच गेल्याचे पुढे आले आहे. नगरमधून तो गुजरातच्या दिशेने सिमेपर्यंत पोहचल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन जिल्हा पोलीस दलाने त्याची सगळी माहिती गोळा केली होती. पोलीसांना प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याचा सध्याचा पत्ता शोधल्यानंतर गुजरातच्या कच्छ भागामध्ये असल्याचे त्याना कळाले होते. तेव्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी गुजरातच्या पोलीसाची मदत घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर तेथील पोलीसांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली. शिवाय त्यानी सीमा सुरक्षा दलास देखील याची कल्पना दिली. तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सूरु झाले होते. अशाप्रकारे संशियतरित्या फिरणाऱ्या तरुणाचा माग काढत सीमा सुरक्षा दलाने अखेर त्याचा शोध लावला. गुरुवारी उस्मानाबाद (ता.१६) येथुन पोलीसांचे एक पथक गुजरातकडे रवाना झाले होते. शुक्रवारी त्यास पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर तिथेच गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद पोलीसांना रिकाम्या हाती परतावे लागल्याचे दिसून येत आहे.
सध्या त्याला क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत. झिशानच्या अडचणीत अधिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे तो पोलीसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.
(संपादन- प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.