गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटू लागल्या चुली

Jalna News
Jalna News

वालसावंगी (भोकरदन) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरोघरी गॅस आला. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता मुक्ती मिळाली. मात्र, गॅसच्या किंमतीत अचानक झालेली मोठ्या वाढीमुळे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.

ग्रामीण भागातील महिलांची चुल्हीच्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी उज्वल्ला योजनेतंर्गत शंभर रूपयात घराघरात गॅस पोचवला. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला. सध्या सर्व महिला गॅसवरच सगळा स्वयंपाक बनवू लागल्या असताना, दिवसेंदिवस गॅसची भाव वाढ सातत्याने सुरू असल्याने ग्रामीण कुटुंबाना गॅस भरणे कठीण झाले. त्यात गेल्या  आरठवड्यात गॅसचे दर 146 रूपयांनी वाढले.

गॅस खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. घरगुती गॅस 145 रुपयांनी महागल्याने  आता गॅस सिलेंडरसाठी 865 रुपये मोजावे लागत आहे.

दरम्यान गॅस खरेदीवर मिळणारी सबसिडी देखील वेळेवर जमा होत नाही. जमा झाली की नाही हे बघण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात. यामुळे दिवसेंदिवस गॅसचे अवघड होत चालले आहे. पूर्वी घरघुती गॅस 480 रुपयांत मिळत असे यामुळे सर्वसामान्य जनतेला तो पुरडवत होता. मात्र आता किंमतीत वाढ होत असल्याने पुन्हा चूल पेटविणे सुरू झाले आहे.

गॅसची झालेली भाववाढ ही न परवडणारी आहे. अगोदर सर्व स्वयंपाक हा गॅसवर केला जात होता. आता गॅसवर सगळा स्वयंपाक करणे परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने चुलीचा वापर करावा लागत आहे. 
- सुमन गारोडी, गृहिणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com