राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार जाहीर : मराठवाड्यातील पाच लेखकांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

चपळगावकर, दळवी, भापकर, घुले, सिंदगीकर यांचा सन्मान 

औरंगाबाद : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दर्जेदार पुस्तकांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार दिले जातात. यंदा या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत मराठवाड्यातील पाच लेखक, कवींच्या नावांचा समावेश आहे. 

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा बुधवारी (ता. 5) मुंबईत झाली. जवळजवळ 35 लेखकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात औरंगाबाद येथील ज्येष्ठ लेखक, विचारवंत निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, नाट्यलेखक अजीत दळवी, निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि कवी डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि कवी गणेश घुले यांचा समावेश आहे. 

वाचा - आलीशान गाडी शेणाने लिंपली आणि त्यातून मुलीला....

नाटक-एकांकिका प्रकारात अजित दळवी यांना समाजस्वास्थ या नाटकासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लघुकथा विभागातील दिवाकर कृष्ण पुरस्कार लातूर जिल्ह्यातील लेखक विलास सिंदगीकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

क्लिक करा - लातूरच्या या लेखकाचा सन्मान

इतिहास विषयातील शाहू महाराज पुरस्कार नरेंद्र चपळगावकर यांना 'त्यांना समजून घेताना' या पुस्तकासाठी, तर शिक्षणशास्त्र विषयातील पुरस्कार डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शैक्षणिक षटकार या पुस्तकासाठी जाहीर झासा आहे. प्रत्येकी एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

हेही वाचा - महिलांनो, अशी घ्या हृदयाची काळजी

बालवाङ्मयात कविता प्रकारात गणेश घुले यांच्या सुंदर माझी शाळा या बालकविता संग्रहाला बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे. 50 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Literature Award Aurangabad News