महाराष्ट्र 'लॉकडाऊन थ्री'मध्ये जाईल : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे सूतोवाच

हरी तुगावकर
Wednesday, 29 April 2020

श्री. देशमुख यांनी बुधवारी (ता. २९) फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी राज्य शासन, प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग काय काय करते आहे याची माहिती तर दिलीच पण जनतेने काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

लातूर : राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पाहता राज्य लॉकडाऊन थ्रीमध्ये जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिकृतपणे जनतेशी संवादही साधतील. लॉकडाऊन थ्रीमध्ये काही शिथिलता मिळले. ही शिथिलता प्रत्येक नागरीकांने जिम्मेदारीने स्वीकारावी लागेल. जनतेने काळजी घेतली नाही तर पुन्हा आपण संकट ओढवून घेवू अशी भिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

श्री. देशमुख यांनी बुधवारी (ता. २९) फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी राज्य शासन, प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग काय काय करते आहे याची माहिती तर दिलीच पण जनतेने काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

सहा महिन्यांच्या बाळाचे शिर कापून फेकले, कुत्र्याने पळवले

कोरोनाने जग बदलून टाकले आहे. वेट ॲण्ड वॉ़चचे सूत्र स्वीकारले आहे. कोरोनाचे संकट कधी संपेल सांगता येत नाही.  यावरील लसीसाठी संशोधक सातत्याने प्रयत्न करीत आहेत. लस जरी निघाली तर ती राज्यातील साडे बारा कोटी जनतेला देण्यासाठी बराच कालावधी लागेल. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. किमान एक दोन वर्ष अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल असे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधकही आपल्याला सातत्याने सांगत आहेत. कोरोनाच्या या युद्धात सर्वांनी घऱात बसूनच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा, शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पण जीवनावश्यक वस्तूंच्याच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करून येणार असेल तर तो मोठा धोका असणार आहे. बाहेर गावाहून कोणी आले असेल तर त्याची माहिती जागरूक नागरीक म्हणून प्रशासनाला द्यावी. आपण कोरोनाचे वाहक तर नाहीत ना याची काळजी घेण्याची गरज आहे. घाबरू नका. कोरोना तुम्हाला भेटायला येणार नाही. घरात बसूनच तुम्ही या युद्धात सहभागी व्हावे, असे श्री. देशमुख म्हणाले.

लातूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. उदगीरमध्ये अधिक काळजी घेतली जात आहे. लातूर जिल्ह्यात बचतगटांनी पाच लाख मास्क तयार केले आहेत. जिल्ह्यातील ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना प्रशासनाच्या वतीने हे मास्क देण्यात येतील, असे श्री. देशमुख म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Will Go In Lockdown Three Said Amit Deshmukh