Jalna| दिराचा चुलत भावजयीवर बलात्कार, नात्याला काळिमा फासणारी घटना

आरोपीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
Rape
RapeRape
Updated on

भोकरदन (जि.जालना) : शेतात काड्या वेचण्यासाठी गेलेल्या भावजयीवर चुलत दिरानेच ज्वारीच्या शेतात फरफडत नेऊन बलात्कार केल्याची घटना भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नात्याला काळीमा फसरणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खबळबळ उडाली आहे. या प्रकरणी २३ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारी वरून हसनाबाद पोलिस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसानी संशयित आरोपी बाबासाहेब विष्णु गव्हांडे (वय २२) याला अटक केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार ती  गुरुवारी (ता.दहा) दुपारी तळेगाव (ता.फुलंब्री) शिवारात असलेल्या शेतात काड्या वेचण्यासाठी गेली होती. (Man Misbehave With Woman In Bhokardan Taluka Of Jalna)

Rape
Parbhani Accident : जिंतूरमध्ये दुचाकी-टेम्पोच्या अपघातात तरुण ठार

या दरम्यान तिचा चुलत दीर संशयित बाबासाहेब विष्णु गव्हांडे हा त्यांच्या ज्वारीच्या शेतात लपून बसला होता. त्यांनी ज्वारीच्या शेतातून अचानक येऊन मला बळजबरीने शेतात ओढत नेले व माझ्यावर बळजबरी करत बलात्कार केला. मी आरडाओरड केल्यामुळे माझा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करत असलेले माझे पती गणेश पळत आले व त्यांनी मला संशयित आरोपी बाबासाहेब गव्हांडे यांच्या तावडीतून सोडवल. यावेळी संशयित आरोपी बाबासाहेब यांनी या घटनेबाबत कुणाला काही सांगितले तर तुम्हा दोघांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली व तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोडके आणि पोलिस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे यांनी(Jalna) तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी बाबासाहेब गव्हांडे याला अटक केली व त्याच्या विरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा बलात्कार (Crime Against Woman) आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास हसनाबाद पोलिस करत आहे.

Rape
अंबानी, अदानी यांची पूजा करा; भाजप खासदाराचा अजब सल्ला

संशयिताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी बाबासाहेब गव्हांडे याला हसनाबाद पोलिसांनी शुक्रवारी (ता.११) भोकरदन येथे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक पाटोळे यांनी सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com