esakal | जळकोट तालूक्यातील मंगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

aarogya kendra.jpg

उभारणीसाठी ६३८ लक्ष रुपये मंजूर, राज्यमंञी संजय बनसोडे यांची माहिती.

जळकोट तालूक्यातील मंगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : तालूक्यातील ९७ हजार लोकसंख्येसाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा तुंटपूजी असल्याने मंगरुळ ता. जळकोट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे अशी मागणी सरपंच महताब बेग व परिसरातील नागरिकांची केली होती. याबाबतचा पाठपुरावा करुन विशेष बाब म्हणून नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले असून उभारणीसाठी ६३८ लक्ष मंजुर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


तालुक्यात ९७ हजार नागरिकासाठी सध्या एक ग्रामीण व दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. घोणसी जिल्हा परिषद गटातील अतनुर व वाजरवाडा गटातील वाजरवाडा याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत आहे. माळहिप्परगा गटात प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ नसल्याने मंगरुळ परिसरातील नागरिकांना सोळा किलोमीटर अंतर असलेल्या वाजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू   झाला आहे. अनेक महिलांच्या प्रसूती रुग्णालयापर्यंत जाण्याआधीच वाटेतच कराव्या लागल्या. दरम्यान मंगरुळ परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे यासाठी सघर्ष चालू ठेवला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते. त्यांनी वेगवेगळ्या त्रुट्या काढत या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करता येणार नाही, असा शेरा दिला होता. पंरतू एक वर्षानंतर महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आले. आणि उदगीर-जळकोट मतदारसंघाला संजय बनसोडे यांच्या नावाने राज्यमंत्री मिळाले. त्यामुळे सदरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला गती मिळाली. राज्यमंत्री यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंञी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुर द्यावी असा आग्राह धरला होता. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनी अखेर मागणी मान्य केली. मंगरुळ (ता.जळकोट) येथे अखेर केंद्रास मंजुरी दिली असून त्यासाठी लागणार निधिही उपलब्ध करून दिला आहे येत्या काळात या भागातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार असून अंतर कमी झाल्याने पैसा व वेळ वाचणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंगरुळ ता.जळकोट या परिसरात जवळ प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील लोकांना उपचारासाठी सोळा किलोमीटर अंतरावर जावे लागत होते. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नव्हता व नागरिकांचा वेळ व पैसा जात होता. राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी विशेष बाब म्हणून नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे.- महताब बेग, सरपंच.