आता 'मुक' नाही 'ठोक मोर्चा' ; ९ ऑक्टोबरपासून तुळजापुरातून आंदोलनाचे तिसरे पर्व

तानाजी जाधवर
Thursday, 24 September 2020

आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीतून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे तिसरे पर्व सूरु करण्यात येणार आहे. 'मराठ्यांचा जागर' हा कार्यक्रम नऊ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात चालु करुन आता मुक नाही ठोक मोर्चाचा एल्गार पुकारण्यात आल्याचा इशारा यावेळी संयोजकांनी दिला आहे.

उस्मानाबाद : मराठा समाजाच्या वतीने आता ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून त्याची सुरुवात तुळजापुरातुन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयकांनी दिली आहे. येत्या नऊ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात महाजागर करुन ठोक मोर्चा आयोजीत करण्यात येणार आहे. राज्यभरातील समन्वयक यामध्ये उपस्थित असणार असल्याचाही विश्वास संयोजकांनी केला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची अंतिम स्थगिती उठविण्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात येणार आहे. ही स्थगिती उठविण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाची आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती उठवून मराठा समाजाला पुर्ववत आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ मराठा समाजालाही देण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. तसा शासन आदेश काढून मराठा समाजाचा समावेश करण्यासंबधीची कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाकडुन विविध खात्यामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती मराठा समाजाच्या आरक्षणानंतर करावी. त्यापुर्वी सर्व प्रकाराच्या नोकर भरतीला तत्काळ स्थगिती देण्यात यावी. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामधील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे, कोपर्डी प्रकरणातील दोषीना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात यावी. मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी बलिदान दिले आहे, त्याकुटुंबाच्या पुनर्वसनासाठी दहा लाख रुपयाची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी तत्काळ दिली जावी, शिक्षण प्रवेश प्रक्रिया आरक्षणानुसार पुर्ववत चालु ठेवण्यात यावी आदी मागण्या यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या सर्व मागणीसाठी आई तुळजाभवानी पवित्र नगरीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे तिसरे पर्व सूरु करण्यात येणार आहे. 'मराठ्यांचा जागर' हा कार्यक्रम नऊ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात चालु करुन आता मुक नाही ठोक मोर्चाचा एल्गार पुकारण्यात आल्याचा इशारा यावेळी संयोजकांनी दिला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha nine October start Movement