esakal | अंबाजोगाईत मराठा समाजाचा विराट मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Beed morcha.jpg

एक मराठा, लाख मराठा, घोषणांनी परिसर दणानला 

अंबाजोगाईत मराठा समाजाचा विराट मोर्चा

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (बीड) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणांनी शुक्रवारी (ता.१६) शहर परिसर दणाणला. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याचा निषेध करीत, शहरातील दोन्ही आमदारांच्या निवासस्थानावर जावून सकल मराठा क्रांती समाजातर्फे मागणीचे निवेदन दिले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शुक्रवारी  सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. प्रारंभी प्रशांत नगर भागात आमदार संजय दौंड यांच्या निवासावर मोर्चा पोचला. तिथे मुलींनी प्रतिनिधित्व करीत मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी मोर्चातील कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच होत्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


 तेथून सावरकर चौक, छत्रपती शिवाजी चौक, राजीव गांधी चौक या मार्गे हा मोर्चा आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानावर मोर्चा पोचला. यावेळी मुलींच्या गटाने आमदार मुंदडा यांना मागण्याचे निवेदन दिले. याच ठिकाणी मोर्चाची सांगता झाली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भगव्या पताका

हा मोर्चा जसजसा पुढील जाईल, तसतशी मोर्चात सहभागी होणारांची संख्या वाढतच होती. शिवाजी चौकापर्यंत मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले होते. तालुक्यातील गावागावातून कार्यकर्ते यात सहभागी झाले. हाती क्रांती मोर्चाची भगवी पताका व डोक्यावर भगवी टोपी परिधान करून कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरालाही भगवे स्वरूप प्राप्त झाले होते.

(संपादन-प्रताप अवचार)