
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता.एक) सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत ४० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते तर यावेळी मतदानाचा विक्रमी आकडा झाला आहे. आठ जिह्यांपैकी परभणी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६७.४४ टक्के मतदान झाले असून तर सर्वात कमी बीड जिल्ह्यात ६२.०८ टक्के इतके सरासरी मतदान झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता.एक) सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत ४० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते तर यावेळी मतदानाचा विक्रमी आकडा झाला आहे. आठ जिह्यांपैकी परभणी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६७.४४ टक्के मतदान झाले असून तर सर्वात कमी बीड जिल्ह्यात ६२.०८ टक्के इतके सरासरी मतदान झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्लयांच्या ८१३ मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान झाले. सकाळी ८ ते १० या वेळातील पहिल्या दोन तासात ७.६३ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ पर्यंत त्यात वाढ होऊन ते २०.७३ टक्के इतके झाले, दुपारी २ वाजेपर्यंत ३७.०८ टक्के मतदान झाले तर ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले. तर मतदान संपण्याच्या वेळेपर्यंत सरासरी ६४.४९ टक्के मतदान झाले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण ३ लाख ७३ हजार १६६ इतके मतदार आहेत त्यापैकी २ लाख ४० हजार ६४९ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात ६७.४४ टक्के मतदान झाले. जालना जिल्ह्यात ६६.५४ टक्के , बीड जिल्ह्यात ६२.०८ टक्के , औरंगाबाद ६३.०५, हिंगोली ६५.५८, नांदेड ६४.०७, लातुर ६६.११ , उस्मानाबाद जिल्ह्यात ६६.९७ टक्के सरासरी मतदान झाले. सकाळी पहिल्या दोन तासात मतदान संथ सुरू होते मात्र दहा वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. १२ वाजेपर्यंत २०.७३ टक्के मतदान होते. त्यात दुपारी २ वाजेपर्यंत १६.३५ टक्के वाढ होऊन ३७.०८ टक्केवारी झाली होती. ४ वाजेपर्यंत पुन्हा १६.२२ टक्के वाढ झाली.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्हानिहाय सरासरी मतदान
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
झालेले मतदान
गेल्यावेळी चव्हाणांचा १५ हजारांनी विजय
यापुर्वी २०१४ मध्ये ३ लाख ६८ हजार ३८५ मतदार होते, त्यापैकी १ लाख ४१ हजार मतदान झाले होते. त्यापैकी १ लाख २९ हजार २१ मते वैध ठरली होती. उमेदवारांची संख्या २३ होती. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांना ६८ हजार ७६५ मते मिळाली होती तर शिरिष बोराळकर यांना ५३ हजार ५११ मते मिळली होती. १५ हजार ११८ मतांनी श्री. चव्हाण विजयी झाले होते. यावेळी मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
(संपादन-प्रताप अवचार)