Marathwada : १ लाख ३५ हजार रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada crime news

Marathwada : १ लाख ३५ हजार रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

वसमत : शहर पोलिसांची रात्रीची गस्त सुरु असताना सोमवार ता. सात सकाळी ५ च्या सुमारास कारमध्ये शासनाने प्रतिबंध केलेला विविध कंपनीचा ८४ हजार ५०० रुपयांचा गुटखा व कार असा एकूण एक लाग ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कार चालकास ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: Marathwada : युवा किराणा व्यापाऱ्यावर गावठी पिस्तूलने झाडली गोळी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीसांची रात्रीची गस्त सुरु असताना शहरात एम एच ३८ -२९६ क्रमांकाची कार गुटखा घेऊन मामा चौकात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

हेही वाचा: Marathwada : आठवड्यातून तीन दिवस हिंगोलीत हळदीचा लिलाव

यावरून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना दिल्यानंतर श्री कदम, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब खारडे, कर्मचारी श्री हेंद्रे, श्री गारोळे व रात्रीच्या गस्तीवर असलेले श्री धुर्वे, श्री भुरके, शेख असीफ हे मामा चौकात दबा धरुन बसले होते.

हेही वाचा: Marathwada : दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बाजारपेठ सज्ज

सोमवारी सकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी कारंजा चौकाकडून मामा चौकाकडे पांढऱ्या रंगाची कार दिसली. पोलिसांनी कार थांबवून चालकास नाव व पत्ता विचारला असता नवीदखान इसाखान पठाण राहणार शुक्रवार पेठ वसमत असे सांगितले.

हेही वाचा: Marathwada : मुकुंदराज घाटात ट्रॅक्टरचा अपघात: १ ठार तर १५ जखमी

या वेळी कारची झडती घेतली असता राजनिवास सुगंधी पाणी मसाल्याचे २५० पुडे ज्याची किंमत ६२ हजार ५०० रुपये, जाफराणी जर्दाचे २५० पुडे किंमत १२ हजार रुपये, केसरयुक्त वजीरचे ५० पुडे किंमत १० हजार रुपये व कारची अंदाजे किंमत ५० हजार रुपये, एक हजार रुपयांचा सँमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Marathwada muktisangram din: मराठवाडा हे नाव कसे पडले? वाचा रंजक इतिहास

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब खारडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी सकाळी ८ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.