कळंबमध्ये कापूस खरेदी केंद्राला पणन महासंघाने दाखविला ठेंगा!  

दिलीप गंभीरे
Friday, 4 December 2020

कळंब तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे संकेत पणन महासंघाने दिले होते. मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरू झाले नाही त्यामुळे खरेदी केंद्राला पणन संघाने ठेंगा दाखविला आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यास सत्ताधारी राजकीय पक्षाने पणन ला भाग पाडावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यामधून केली जात आहे.

कळंब (उस्मानाबाद) : कळंब तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे संकेत पणन महासंघाने दिले होते. मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरू झाले नाही त्यामुळे खरेदी केंद्राला पणन संघाने ठेंगा दाखविला आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यास सत्ताधारी राजकीय पक्षाने पणन ला भाग पाडावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यामधून केली जात आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरडवाहू आणि माळरान शेतीत लागवड केलेल्या कापसाची वेचणी शेतकरी खरेदी केंद्र सुरू कधी होते याची वाट पहात आहेत. कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असून वेचणी केलेला कापूस विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्याकडून कवडीमोल दराने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्याना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कळंब तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात खरेदी केंद्र करण्याचे संकेत पणन महासंघाने दिले होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात कळंब येथे खरेदी केंद्र सुरू करण्यास ठेंगा दाखविल्याचे उघड होत आहे. बीड, परभणी आदी ठिकाणी पणने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱयांना झुलवत ठेवले असल्याचे आता उघड होत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी पणनच्या वरिष्ठ व्यवस्थापणाला खरेदी केंद्र सुरू करण्याविषयी वारंवार मागणी केल्याची माहिती आहे. मात्र पणनकडून मागणीला केराची टोपली दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी केल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घसरण झाली आहे. त्यामुळे चोहोबाजूने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असताना पणन संघाने कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्याना दिलासा देणं महत्वाचे आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातच खरेदी केंद्र सुरू करण्यास पणने परवानगी दिलेली नाही. शेतकरी अर्थिक संकटात असताना खरेदी केंद्र का? तात्काळ सुरू करण्यात येत नाही असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. 

मनुष्यबळ उपलब्ध नाही;

दरम्यान पणन महासंघाचे वरिष्ठ व्यवथापक (नागपूर) जयेश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यास अडचणी येत असून राज्यातील केंद्रावर ३४ मनुष्यबळ आहे. मागणी जास्त असल्याने खरेदी केंद्र सुरू होईल की नाही हे सांगणे कठीण असल्याचे असे चित्र सध्या आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marketing Federation shows support cotton procurement center Kalamb