esakal | फोर व्हिलर जात नाही म्हटल्यावर मंत्री आमदारांच्या बाईकवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर  
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar.jpg

शेतकऱ्यांना सरसगट मदत नाही, नुकसानग्रस्त एकही वंचित राहणार नाही - राज्यमंत्री सत्तार 

फोर व्हिलर जात नाही म्हटल्यावर मंत्री आमदारांच्या बाईकवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर  

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत फिरत आहे. विविध भागातील शेतकरी बांधवांशी भेट घेत आपणास मदत नक्की देऊ असे आश्वासन देऊ लागले आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उस्मानाबाद तालूक्यातील बेगडा शिवारात नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राज्यमंत्री सत्तारांची फोर व्हिलर गाडी शेतापर्यंत जात नव्हती. त्यावेळी सत्तारांनी आमदार कैलास पाटील घाडगे यांच्या दुचाकीवर बसून बेगडा शिवारातील शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी करुन त्यांना दिलासा दिला. त्यामुळे मंत्री थेट आमदारांच्या बाईकवरुन शेतकर्यांच्या बांधावर गेल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

शेतकऱ्यांना सरसगट मदत दिली जाणार नसली तरी एकही नुकसानग्रस्त शेतकरी मंदतीपासून वंचित राहणार नाही, याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. येत्या पाच ते सहा दिवसात पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच शासनाकडून मदत दिली जाईल, असा विश्वास राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी  (ता.२०) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार कैलास घाटगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी सत्तार म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० हजार ३६१ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये एक लाख ३६ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

प्रशासनाला पंचनामे करण्यासाठी अडथळे येत आहेत. तसेच अधूनमधून पाऊसही मोठ्या प्रमाणात हजेरी लावित आहे. तरीही पाच ते सहा दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सरसगट सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण असले तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. प्रशासनालाही तशा सूचना दिल्या आहेत. असेही सत्तार यावेळी म्हणाले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाचा मदतीला अडथळा

कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही राज्य सरकार मदत देणारच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दौऱ्यावर येत आहेत.  त्यातच केंद्र शासन जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा पैसा राज्याला देत नाही. अद्यापही २६ हजार कोटी रुपये राज्याला येणे बाकी आहे. राज्याच्या हा हक्काचा पैसा आहे. अशाच कारणामुळे भरघोस मदत देता येणार नाही. पण, पंचनाम्याचे काम पूर्ण होताच मदतीला सुरूवात होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टोलवाटोलवीत तरबेज 
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पाच वर्ष टोलवाटोलवी कशी करावी, हेच शिकविले आहे. त्यामध्ये ते खूप तरबेज आहेत, असे म्हणत सत्तार यांनी फडणवीसांना टोला लगावला. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image