आ. पाटील यांनी खा. राजेनिंबाळकरांवर साधला निशाना, म्हणाले कथीत बैठकांतील निर्णय तरी सांगा   

तानाजी जाधवर
Wednesday, 2 September 2020

मोघम पत्रकबाजी करणारे खासदार राजेनिंबाळकरांनी त्यांच्या कथीत बैठकात कौडगाव एम. आय. डी. सी बाबत काही निर्णय झाले काय ? झाले असेल तर जनतेसमोर मांडावे. असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केले असून राजेनिंबाळकरांवर निशाना साधला आहे. .

उस्मानाबाद : उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर घणाघाती टिका केली. उद्योग बुडविणार्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नये, असा टोला त्यानी आ. पाटील यांना लगावला होता. त्यावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील खासदार राजेनिबांळकर यांच्यावर निशाना साधला आहे.

मोघम पत्रकबाजी करणारे खासदार राजेनिंबाळकरांनी कौडगाव एम. आय. डी. सी बाबत काही निर्णय झाले का, झाले असेल तर जनतेसमोर मांडावे असे ते म्हणाले. त्यामुळे पुन्‍हा एकदा उस्मानाबादचे राजकारण पेटले आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कौडगाव एम. आय. डी. सी विकासाचा विषय मी सुरू केला होता. तो जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली सहा वर्ष यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून देखील शिवसेनेचे उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी यासाठी कांहीही केली नाही, हे वास्तव आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

मोघम पत्रकबाजी करण्यापेक्षा एकेकाळी तेरणा कारखान्याचे सर्वेसर्वा असणारे व ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याची अधोगती झाली. ते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या कथित बैठकांत कौडगाव एम.आय.डी.सी बाबत चर्चा व कांही निर्णय झाले असतील तर जरूर जनतेसमोर मांडावेत. या प्रकल्पासाठी मदत करणं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते त्यांनी जरूर कराव. त्यासाठी त्यांना आमच्या अनेक शुभेच्छा असे आमदार राणा पाटील यांनी म्हटले आहे.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन   

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rana Jagjit Singh Patil criticizes MP Omraje Nibalkar