esakal | राज्य सरकारची आर्थिक मदत तुटपूंजी : आमदार राणा पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

aamdar rana patil.jpg

ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी. 

राज्य सरकारची आर्थिक मदत तुटपूंजी : आमदार राणा पाटील 

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली दहा हजारांची मदत तुटपूंजी असून किमान पंचवीस हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतुन बाहेर काढावे, असे मत माजी मंत्री, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


उमरगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त येणेगुर, तुंगाव, गुंजोटी व मुरूम परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची आमदार पाटील यांनी शनिवारी (ता. २४) पाहणी करून विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे, माजी अध्यक्ष नेताजी पाटील, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, माजी बांधकाम सभापती अॅड. अभयसिंह चालुक्य, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव पवार, हर्षवर्धन चालुक्य, राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचा ऊस पूर्णतः आडवा पडला असल्याने ऊस व फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठी असलेल्या शेतातील जमिनीची माती पूर्ण वाहून गेली आहे. अनेक गावातील घरात पुराचे पाणी गेल्याने घराची ओल कायम आहे. घरे खचली आहेत. तुगाव येथील घराचे  पंचनामे झाले नाहीत. त्याचे तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत पिकांची, जमिनीची फळबागाची व खचलेल्या घराची आणि जमिनीतील माती वाहून गेल्याची वेगवेगळ्या प्रकारची मदत शासनाने करावी ज्याच्या जमिनीतील माती वाहून गेली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याना जमिनीत माती टाकण्यास मदत करावी. शेतकऱ्यांचा एकही रुपया खर्च न करता सरकारने शेती दुरुस्तीसाठी वेगळी योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने मदत देण्याचे जाहीर केले आहे, त्याला राज्य सरकारकडून रितसर मागणीचा प्रस्ताव सादर करावा लागतो नंतर केंद्रीय पथक पाहणी करते. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून संकट काळात सोबत असल्याचे सांगितले आहे. ती मदत निश्चित मिळेल अशी खात्री त्यांनी दिली. या वेळी नगरसेवक अरुण इगवे, सुनील माने, गोविंद पवार, उमेश स्वामी, अनिल बिराजदार, आकाश शिंदे, अमर वरवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ओला दुष्काळ जाहिर करा 

राज्य सरकार अस्तित्वात येण्याआधी आदित्य ठाकरे यांनी तत्कालिन स्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यपाल यांच्याकडे केली होती. तेंव्हाची दूरचित्रवाहिनीवरील क्लिप दाखवून दाखला दिला. आताच्या स्थितीतील चित्र विदारक आहे, सरकार त्यांचे आहे. ओलावा दुष्काळ जाहिर करायला काय हरकत असा सवाल आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

(संपादन-प्रताप अवचार)