esakal | चक्क ! आमदारांनीच धुतले बॅंक अधिकाऱ्याचे पाय, वाचा कुठे घडला हा प्रकार आणि का ?
sakal

बोलून बातमी शोधा

suresh dhas.jpg

बँक अधिकाऱ्यांना घरी बोलावून त्यांचे अगोदर पाय धुतले, मग त्यावर फुलेही वाहीली. तेवढ्यावर न थांबता मग नवा कोरा गमचाही त्यांच्या गळ्यात टाकला. हा विधी करताना ‘मुन्नाभाई एमबीबीएस गांधीगीरी’ हा त्यांचा जप सुरु होता. बीड जिल्ह्यातील आमदार आमदार सुरेश धसांनी पीक कर्जासाठी गांधीगीरी केली. बॅंक अधिकार्याचे पाय धुवून, फुले वाहिली. 

चक्क ! आमदारांनीच धुतले बॅंक अधिकाऱ्याचे पाय, वाचा कुठे घडला हा प्रकार आणि का ?

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : गुरुचे पूजन करताना किंवा एखाद्या महाराजांचे पाय धुवून फुले वाहीली जातात. पादुकांचेही असेच पुजन केले जाते. पण, आमदारांनी थेट बँक अधिकाऱ्याचे पाय धुवून फुले वाहिली आणि गमचाचा आहेर चढविला. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी भाजप आमदार सुरेश धसांनी ही गांधीगीरी केली.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकऱ्यांची सतराशे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नाही. बँक अधिकारी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना खेटे मारायले लावत आहेत. त्यांना कोणी चढ्या आवाजात बोलले तर त्यांचा बीपी वाढतो. त्यामुळे अनेक वेळा थेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना चढ्या आवाजात एव्हाना वेळप्रसंगी अंगावर जाऊन कामे करायला लावणाऱ्या सुरेश धसांनी या अधिकाऱ्यासाठी जालिम उपाय शोधला.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

बँक अधिकाऱ्यांना घरी बोलावून त्यांचे अगोदर पाय धुतले, मग त्यावर फुलेही वाहीली. तेवढ्यावर न थांबता मग नवा कोरा गमचाही त्यांच्या गळ्यात टाकला. हा विधी करताना ‘मुन्नाभाई एमबीबीएस गांधीगीरी’ हा त्यांचा जप सुरु होता. पुर्वीच्या सरकारची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व आताच्या सरकारची महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचा सरकारने दंडक घालून दिलेला असताना तुम्ही कर्ज देत नाहीत. आम्ही यापेक्षा तुमचे काही करु शकत नाहीत. तुमचे काय म्हणणे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना सांगा असेही सुरेश धस म्हणाले. तुम्ही शेतकऱ्यांना विनाकारण आडवू नका, खेटे मारायला लावू नका असेही धस म्हणाले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन   

(संपादन-प्रताप अवचार)