आमदार तान्हाजी मुटकुळे मदतीसाठी सरसावले 

tanhaji mutkule
tanhaji mutkule

हिंगोली : जिल्हाभरात संचारबंदी सुरू आहे. या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी अनेक समाजिक संस्‍था, मंडळांनी पुढाकार घेतला असून शुक्रवारी (ता.२७) आमदार तान्हाजी मुटमुळे यांनी पाचशे ते सातशे गरजूंना अन्नदान केले. 

जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी सुरू आहे. शहरात गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनासह दुकानदार, भाजीविक्रेते घेत आहेत. प्रत्‍येकांनी दुकानासमोर एक मीटरवर गोल रिंगन करून साखळी तोडण्यास प्राधान्य दिले जात आहे.  संचारबंदीत सर्वच कामे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

मुख्याधिकारी रामदास पाटील यांचे आवाहन

शहरात कोणी उपाशी राहणार नाही, याची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरातील समाजिक संस्‍था, मंडळे, अन्नदात्यांना पुढे यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील सामाजिक संस्‍थांनी पुढाकार घेत खासगी रुग्णालये, बसस्‍थानक, रेल्‍वेस्‍थानक परिसरातील गरजूंना अन्नदान केले जात आहे. शहरातील गायत्री परिवार व विघ्नहर्ता ग्रुपतर्फे देखील अन्नदानाचे वाटप केले जात आहे. 

पोळ्या, भाजी व मसाला खिचडीचे वाटप 

दरम्‍यान, शुक्रवारी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शहरातील अन्नदान केले. दोन पोळ्या, भाजी व मसाला खिचडीचे पॉकेट तयार करून शहरातील अकोला बायपास भागातील पालावरील नागरिक, तसचे रिसाल नाका आदी भागात पॉकीटाचे वाटप केले. संचारबंदीच्या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील अन्नदान करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रशांत सोनी, कैलास काबरा, हमीद प्यारेवाले, मोतीराम इंगोले, संदीप वाकडे, मनोज शर्मा आदींची उपस्‍थिती होती.  

तलाठी संघाकडून एक दिवसाचे वेतन 

हिंगोली : राज्यातील कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी तलाठी संघाकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व तलाठ्याचे मिळून जवळपास चार कोटी रुपये कपात करण्याचे लेखी निवेदन राज्य तलाठी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिले आहे. चार दिवसांपासून कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा फैलाव पसरू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

चार कोटी रुपयांचा निधी 

 उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेकांनी शासनाला मदतीचा हात दिला आहे. तलाठी संघाने देखील कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी एक महिन्याचे वेतन कपात करण्याचे निवेदन दिले आहे. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार यांचा समावेश असून जवळपास चार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय राज्य तलाठी संघाने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com