ऑनलाइन शिक्षणाला नेटवर्कचा अडसर 

टेंभुर्णी : घरी बसून मोबाईल फोनच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थिनी.
टेंभुर्णी : घरी बसून मोबाईल फोनच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थिनी.

टेंभुर्णी (जि.जालना) -  सध्या मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविताना दिसत आहेत. काही प्रमाणात ऑनलाइन धडे घेण्यासाठी मुले उत्सुक आहेत. मात्र मोबाईल नेटवर्कची वारंवार येणारी अडचण या शिक्षणाला अडसर ठरत आहे. 

कोरोना वाढत्या संसर्गामुळे मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत सर्वच ठिकाणी विचार सुरू आहे. या पद्धतीने शिक्षण देऊन शाळा सुरू होईपर्यंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यूट्युब, व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून आपल्या विषयाचे व्हिडिओ, ऑडिओ मुलांपर्यंत पाठवण्याची प्रक्रिया होत आहे. 

ऑनलाइन शिक्षण देण्यात शासन आग्रह करत आहे मात्र या प्रक्रियेत मोबाईल कंपन्या मोठा अडसर ठरत आहेत. रिचार्जच्या किमती वाढवून ग्राहकांची लूट केली जात आहे. तीन महिन्यांचे रिचार्ज करण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये मोजावे लागत आहेत.

पोटाची खळगी कशी भरावी हा भीषण प्रश्न समोर असताना एवढा पैसा खर्च करणे कठीणच आहे. काही प्रमाणात पाल्याच्या आग्रहाने अनेक पालकांनी नवीन अँड्रॉईड मोबाईल खरेदी केले आहेत, तर अनेकजण खरेदीसाठी प्रतीक्षेत आहेत. 

केवळ २८ दिवसांचा महिना 

फेब्रुवारी महिना वगळता कोणत्याच महिन्यात २८ दिवस नाहीत मात्र मोबाईल कंपन्यांचे गणित उलटेच आहे. एका महिन्याचे रिचार्ज सांगून २८ दिवसांचा लाभ तर ३ महिन्यांचे म्हणून ८४ दिवसांचा लाभ दिला जातो. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे. 


(संपादन : संजय कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com