जालना जिल्हातील हृदयद्रावक घटना : बेपत्ता असलेल्या माय-लेकराचा मृतदेह आढळला विहिरीत 

आनंद इंदानी
Wednesday, 22 July 2020

देवपिंपळगाव शिवारात शेतातील घरातून निघून गेलेल्या माय-लेकराचा मृतदेह बुधवारी (ता.२२) सकाळी स्वतःच्या शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत २५ वर्षीय विवाहित महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलासह मंगळवारी (ता.२१) सकाळी ७ वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती.

बदनापूर (जिल्हा. जालना) : देवपिंपळगाव शिवारात शेतातील घरातून निघून गेलेल्या माय-लेकराचा मृतदेह बुधवारी (ता.२२) सकाळी स्वतःच्या शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत २५ वर्षीय विवाहित महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलासह मंगळवारी (ता.२१) सकाळी ७ वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी (ता.२२) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बदनापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

देवपिंपळगाव शिवारातील शेतातील घरात राहणाऱ्या गोदावरी बाळासाहेब नन्नवरे (वय २५) व  त्यांचा मुलगा सार्थक बाळासाहेब नन्नवरे (वय ५) दोघे मंगळवारी सकाळी सात वाजता आपल्या राहत्या घरातून निघून गेले होते. या संदर्भात त्यांचे पती बाळासाहेब गोरखनाथ नन्नवरे (वय ३०) यांनी दिलेल्या माहितीवरून मंगळवारी (ता.२१) सायंकाळी बदनापूर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी (ता. २२) सकाळी आई गोदावरी व मुलगा सार्थक यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना दिसून आला. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

याबाबत बाळू बबनराव नन्नवरे (रा. देवपिंपळगाव) यांच्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, फौजदार पूजा पाटील, सहाय्यक फौजदार इब्राहिम शेख, निवृत्ती शेळके, श्री. खंडागळे, नितीन ढिलपे, श्री. जारवाल, अनिल चव्हाण या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, दोघा माय-लेकरांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेलगाव (ता. बदनापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या की घातपात या बाबत बदनापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

(संपादन : प्रताप अवचार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother and son body was found in the well