esakal | उद्योग बुडविणाऱ्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नये, वाचा कोणी लगावला कोणाला टोला.  
sakal

बोलून बातमी शोधा

Rana-Om.jpg

उद्योग बुडविणाऱ्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नयेत, असा टोला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना नाव न घेता लगावला आहे.

उद्योग बुडविणाऱ्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नये, वाचा कोणी लगावला कोणाला टोला.  

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : मुख्यमंत्री व उद्योगमंत्री सक्षम आहेत. ते जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेत आहेत. त्यामुळे उद्योग बुडविणाऱ्यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नयेत, असा टोला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना नाव न घेता लगावला आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

राजेनिंबाळकर म्हणाले की, तुमच्या आजवरच्या कारकिर्दीचा आलेख जनतेला ज्ञात आहे. तुमचा शहाजोगपणा जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे. जिल्ह्याच्या विकासांची तुम्ही चिंता करु नका व मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. उद्योग विषयावर बैठक लावण्याची विनंती करण्याअगोदर आमदारांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. असा चिमटाही खासदार राजेनिंबाळकर यानी घेतला. उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नासंबंधी बैठक पार पडली असून त्यामध्ये सविस्तर चर्चा देखील झाली आहे. यानंतर खास तुमच्यासाठी बैठक आयोजीत करण्याची तुमची मागणी हा निव्वळ 'विनोद'च मानला पाहिजे. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   

आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री आहेत म्हणुनच तर आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी ही बैठक बोलावली. त्यामुळं जिल्ह्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असला शहाजोगपणा यापुढे बंद करावा, असा इशाराही खासदार राजेनिंबाळकर यानी विरोधकांना दिला. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा आमच्या नेतृत्वानी काय करावे हे सांगण्याइतकी तुमची पात्रता नाही हे सुध्दा लक्षात ठेवावे असाही प्रतिटोला त्यानी लगावला. नुसतं पत्रक काढुन व पोकळ विकासाच्या गोष्टी करुन जिल्ह्याचे चित्र बदलणार असते तर तुमच्या निवेदनाच्या पत्रावळ्या वरुन मागेच जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलुन गेला असता. या जिल्ह्यावर मागासचा शिक्का ज्यांच्यामुळं बसलाय तेच आता नव्याने विकासांच्या बाबतीत बोलतायेत यापेक्षा हास्यास्पद काय असावे असा आरोपही त्यानी यावेळी केला.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

जिल्ह्याच्या जनतेला उद्देशून राजेनिंबाळकर म्हणाले की, जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने बैठका घेऊन त्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी समोर आलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न देखील सुरु केले आहेत. पण आम्हाला नुसते पत्रक काढुन गाजावाजा करायची सवय नाही. जे काय होतय ते आमच्यामुळेच असला स्वभावही आमचा नाही. विकासांच्या बाबतीत आमचं सरकार कटीबध्द असून योग्य दिशेन काम करत आहे, असा विश्वास खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image