esakal | खासदार संजय जाधव यांचे राजीनामा अस्त्र आले कामी, मागणीला मिळाला न्याय...
sakal

बोलून बातमी शोधा

khasdar

खासदार संजय जाधव यांच्या मागणीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गांभीर्याने घेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर व मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या मुदतवाढीस शनिवारी (ता.२९) स्थगिती दिली आहे.

खासदार संजय जाधव यांचे राजीनामा अस्त्र आले कामी, मागणीला मिळाला न्याय...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः खासदार संजय जाधव यांच्या मागणीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गांभीर्याने घेत जिंतूर व मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या मुदतवाढीस शनिवारी (ता.२९) स्थगिती दिली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळास मुदतवाढीच्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा दिला होता. या राजीनामा पत्रातून खासदार संजय जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या या प्रशासकीय मंडळास दुस-यांदा मुदतवाढीचा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर घोर अन्याय आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. 


हेही वाचा - राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द- जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश 

प्रधान सचिवांना दिले आदेश 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेही भेट घेवून त्या विषयाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली. याच बाबीची मंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिंतूर व मानवत समितीवरील नेमलेल्या प्रशासक मंडळास स्थगिती द्यावी, अशी शिफारस ता.२७ ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या पत्रावर जिंतूर व मानवत समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत तपासणी करावी तोपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे, असे टिपणी करीत पणनच्या प्रधान सचिवांना आदेश दिला आहे असे समजते.

हेही वाचा - मराठवाड्यात मंगळवारपासून परभणीच्या खासदारांचे स्वाक्षरी मोहीम, कशासाठी ते वाचा... 

शिवसैनिकांची मुस्कटदाबी होत असल्याचा केला आरोप
खासदार संजय जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेवून मुख्यमंत्र्यांपर्यत हा प्रश्न लावून धरला होता. त्याचबरोबर आपण शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाहीत, तर आपण खासदार पदावर राहून उपयोगच काय ? असा थेट प्रश्न मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केला होता. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वाढते प्राबल्य व त्यांच्याकडून सातत्याने शिवसैनिकांची मुस्कटदाबी होत असल्याचा गंभीर आरोपही खासदार संजय जाधव यांनी केला होता. या राजीनामा पत्रात खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचे पुर्ण विश्लेषण केले होते. याची गंभीर दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील खासदार संजय जाधव यांनी आपले गाह्राणे मांडले होते.


शेवटी सत्याचा विजय होतच असतो
मी जिल्ह्यातील पूर्ण सत्यता पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर मांडली. हीच सत्यता त्यांनी देखील पडताळून पाहीली.
त्यानंतर त्यांनी जिंतूर आणि मानवत बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या निवडीस स्थगिती बहाल केली आहे. शेवटी सत्याचा विजय होतच असतो. - संजय जाधव, खासदार, परभणी

संपादन ः राजन मंगरुळकर